काँग्रेस च्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत घेऊन दुर्दैवी पायंडा रचला असल्याची काँग्रेसने केली जाहीरनाराजी व्यक्त.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, December 24, 2020

काँग्रेस च्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत घेऊन दुर्दैवी पायंडा रचला असल्याची काँग्रेसने केली जाहीरनाराजी व्यक्त..

काँग्रेस च्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत घेऊन दुर्दैवी पायंडा रचला असल्याची काँग्रेसने केली जाहीर
नाराजी व्यक्त..                                                                                                                  मुंबई :नुकताच  उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी स्थानिक लेव्हलला शिवसेना कार्यकर्त्यांशी जुळवून घेण्याचे कार्यकर्त्यांना सांगितले असतानाच भिवंडी महापालिकेचे उपमहापौर इम्रान अली मोहम्मद खान यांच्यासह
काँग्रेसच्या १८ नगरसेवक, मिरा-भाईंदर महापालिकेच्या माजी महापौर निर्मला
सावळे,माजी विरोधी पक्षनेते लियाकत शेख यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला तोही उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अशातच राष्ट्रवादीने स्वतनःचा मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसलाच खिंडार पाडलं आहे. यावर काँग्रेसने आता जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या
प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे. 'भिवंडी महापालिकेतील काही
नगरसेवक हे केवळ तांत्रिक दृष्ट्या काँग्रेस पक्षात होते. महापौर निवडणुकीत पक्षादेशाच्या विरोधात जाऊन मतदान केल्याप्रकरणी पक्षांतर्गत बंदी कायद्यान्वये त्यांच्यावरील कारवाई विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित आहे.काँग्रेस पक्ष याचा पाठपुरावा करत आहे अशी माहिती त्यांनी दिली.मित्र पक्षाने असा दुर्देवी पायंडा पाडल्याने कॉग्रेस नाराज झाली असल्याचे समजते.

No comments:

Post a Comment