बारामतीमध्ये नविन वर्षाच्या संध्येला उत्कर्षा महिला बचतगटाची स्थापना..
बारामतीः नवीन वर्षाच्या संध्येला नव्या उमदेने महिलांनी एकत्र येवुन बारामती मधील
महिलांनी उत्कर्षा महिला बचत गटाची स्थापना केलेली आहे. आज नविन वर्षाचे
औचित्य साधुन नविन संकल्पना मनामध्ये ठेवून आमराई विभागातील महिला एकत्र येवुन त्यांनी उत्कर्षा महिला बचत गटाची स्थापना केलेली आहे या मध्ये सदर गटामार्फत सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, तसेच क्रिडा या क्षेत्रामध्ये देखील भरीव असे काम केले जाईल अशी माहिती बचत गटाच्या अध्यक्षा सौ.शमा रज्जाक शेख यांनी दिली तसेच हा बचत गट आमराई विभागातील इतर महिलांसाठी प्रेरणादायी म्हणून पुढील काही काळामध्ये उदयाला येईल असे महिला बचत गटाच्या सचिव सौ.स्मिता कैलास शिंदे यांनी सागितले तसेच बचत गटाच्या खजिनदार पदी अश्विनो विक्रांत भोसले यांची निवड झाली. या बचत गटासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणुन बारामती नगरपरिषद कार्यालातील मा श्री मुल्ला साहेब यांवे देखील मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.या प्रसंगी आरती भोसले, शोभा सोनवणे, पूजा मोरे, सांची रणधीर,मिनाक्षी शिंदे, शिला खंडाळे, रामेश्वरी मोरे, कोमल भोसले, तेजस्वी कदम स्वाती खरात इत्यादी महिला सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment