तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी साके गावात निवडणुकीच्या मैदानात!सौ.अश्विनी(वहिनी) कृष्णा शीलवंत... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 11, 2021

तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी साके गावात निवडणुकीच्या मैदानात!सौ.अश्विनी(वहिनी) कृष्णा शीलवंत...

तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी साके गावात निवडणुकीच्या मैदानात!
सौ.अश्विनी(वहिनी) कृष्णा शीलवंत.
..................................................... कोल्हापूर.-( प्रतिनिधी):-त्या स्वभावाने अतिशय मन मिळावू आहेत.गावातील सर्व लहान-थोर मंडळींच्या बरोबर विकास कामाच्या संदर्भात अतिशय दूरदृष्टीने व चांगल्या हेतूने सामाजिक काम करण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून,बीए डीएड अशी पदवीधर असलेल्या,सौ अश्विनी कृष्णा शीलवंत या साके तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील ग्रामपंचायत निवडणूक 2021 ला, प्रभाग क्रमांक दोन मधून उभारले असून,
त्यांची सुरू असणारी विजयाकडे वाटचाल,  घोड - दौड अतिशय वेगाने सुरू आहे.
त्यांचे पती अर्थातच लेखक,कवी हळव्या मनाचा माणूस म्हणून ओळख असलेले
व प्राथमिक शिक्षकश्री.कृष्णा शीलवंत यांचा मनमिळावू स्वभाव तसेच सर्वांना समवेत घेऊन जाणारा,आपला हक्काचा माणूस अशी गावात व परिसरात ओळख असल्याने,यामध्ये महिला, पुरुष,युवक युवती आदींचा,वाढता पाठिंबा
सौ.अश्विनी शीलवंत वहिनी यांना मिळत आहे. ग्रामपंचायत अर्थातच मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पदवीधर महिला उतरल्याने, ग्रामपंचायत साके गावातील निवडणुकीत,
सौ.अश्विनी शीलवंत यांच्या नावाचे विजयाची चर्चा जोरात सुरू आहे.महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम सन 2021 सर्वत्र सुरू झाल्याने मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणाऱ्या गावातील ग्रामपंचायत साके तालुका कागल,या ग्रामपंचायतचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2021 च्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दोन मधून सौ.अश्विनी कृष्णा शिलवंत रा.साके  वहिनी 2021 च्या ग्रामपंचायत निवडणुक रिंगणात उतरले आहेत. बीए.डीएड पदवी पर्यंतचे झालेले शिक्षण,साके गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना सार्थकी लावायचे आहे.गावातील अनेक प्रश्न उदाहरणात पाण्याची तीव्र समस्या, विजेचा नेहमी होणारा खेळखंडोबा, रस्त्यांची अंतर्गत झालेली दुर्दशा, पावसाळ्यामध्ये तुडुंब असणारे गटर्स व त्यातून तुंबनारे  घाण पाणी व त्यामुळे डासांच्या पासून होणारी रोगराई,तसेच विविध आजाराला दिले जाणारे निमंत्रण होऊ नये याकरिता,सौ अश्विनी वहिनी यांनी,ग्रामस्तरावरती विकासाच्या कोणत्या योजना मॉडेलच्या स्वरूपात आणता येतील याचा जाहीरनाम्यामध्ये खुलासा केलेला आहे.साके गावातील वाड्या वस्ती वरती अनेक पारंपारिक समस्या जैसे त्या ठाण मांडून बसलेले आहेत,त्याला मोकळी वाट करून देण्यासाठी विकासाची नवीन, संकल्पना राबवण्यासाठी,आदर्श ग्राम योजनेमध्ये
साके ग्रामपंचायतला प्रथम क्रमांक वरती आणण्यासाठी निवडणुकीला उभा राहण्याचा माझा अतिशय प्रामाणिक असा संकल्प असल्याचे सौ.अश्विनी शीलवंत वहिनी यांनी मराठी न्यूज नेटवर्क शी बोलताना सांगितले.
 गावातील महिलांना लघु कुठे उद्योगाचा आधार नसल्याने मार्गदर्शन नसल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध योजना साके ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरोघरी महिलांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी,ग्रामपंचायत निवडणुकीला उभारल्याचे त्यांनी आपला माणस स्पष्ट केला.गाव गाड्यावरील नेमक्या पारंपारिक समस्या, त्या समस्या हाताळण्यासाठी निवडून जाणाऱ्या तज्ञ सदस्यांना व ग्रामविकास अधिकारी तथा ग्रामसेवक यांना सोबत घेऊन पाच वर्षे अतिशय चांगला व पारदर्शक कारभार
करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
..................................................

No comments:

Post a Comment