वादग्रस्त API सचिन वाझेंना 11 दिवसाची न्यायालयीन कोठडी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, March 14, 2021

वादग्रस्त API सचिन वाझेंना 11 दिवसाची न्यायालयीन कोठडी

वादग्रस्त API सचिन वाझेंना 11 दिवसाची न्यायालयीन कोठडी                                             मुंबई(प्रतिनिधी) :- वादग्रस्त ठरलेले api सचिन वाझेना 11 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली,उद्योगपती अंबानी यांच्या घराजवळ स्कार्पिओ मुकेश गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर पोलीस अधिकारी सचिन
वाझे यांना एनआयएने अटक केली आहे.त्यानंतर वाझेंना रविवारी (दि. 14) दुपारी विशेष NIA कोर्टात सुट्टीकालीन खंडपीठासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 11 दिवसाची NIA कोठडी सुनावली आहे. त्यामुळे वाझेंना पुन्हा 25 मार्चला NIA कोर्टात रिमांडसाठी हजर करण्यात येणार आहे. रविवारी सुट्टीकालीन न्यायालयात 40 मिनिट युक्तिवाद करण्यात आला. यावेळी वाझे यांच्या वकिलांनी कोणताही ठोस पुरावा नसताना केवळ संशयावरून अटक केल्याचा युक्तीवाद केला. तर NIA ने कसून चौकशीसाठी
कोठडीची मागणी केल्याचे म्हटले आहे. वाझेंच्या
अटकेनंतर ठाण्यातून आणखी काहींना अटक
होण्याची शक्यता आहे. यात इनोव्हा गाडीतून जाणारे दोन्ही चालक आणि एका
व्यावसायिकाचा समावेश असल्याचे सांगितले
जात आहे. दरम्यान आता वाझे यांचे जवळचे
मित्र सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाझ काझी
यांची NIA कडून गेल्या 5 तासांपासून चौकशी
सुरु आहे. काझी यांच्या चौकशीनंतर CIU
विभागातील आणखी काही पोलिसांची चौकशीची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच विक्रोळी पोलीस ठाण्यातील पोलिस देखील
NIA च्या चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची
शक्यता आहे.

No comments:

Post a Comment