माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपाह्म मजकूर प्रसारित केल्या
प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल! बारामती:-महाविकास आघाडी सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाच्या संदर्भात दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी ट्विटर अकाउंट वरून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.उपनगराध्यक्ष अभिजित उर्फ बाळासाहेब जाधव यांनी यासंदर्भात तालुका पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून वेदश्री@ वेदश्री 19 आणि राजे हर्षवर्धन शास्त्री या दोन ट्विटर अकाउंट
धारकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अभिजित जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असून बारामतीचे उपनगराध्यक्ष आहेत. त्यांचे मित्र अजित कदम (रा. जळोची) हे देखील पक्षाचे कार्यकर्ते आहेत. अजित कदम यांचा मार्केटिंगचा व्यवसाय असून ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. 23 मार्च रोजी सकाळी दहा वाजता अजित कदम हे अभिजीत जाधव यांच्याकडे आले व त्यांनी सांगितले की, सोशल मीडियावर ट्विटरवरील संदेश पाहताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी एका प्रेस समोर केलेल्या वक्तव्याबाबत बाजूला एका मुलीचा मास्क लावलेला फोटो असलेल्या वेदश्री अॅट द रेट वेदश्री 19 ट्विटर (vedashree@vedashree19) अकाऊंटवरून आक्षेपार्ह मजकूर लिहून शरद पवार यांचे फोटोसह ट्विट केल्याचे दिसले. सदर वेदश्री नावाने ट्विटर अकाउंटवर केलेल्या सदर पोस्टला राजे हर्षवर्धन शास्त्री या ट्विटर अकाउंट धारकाने या त्याच्या अकाऊंटवरून वरील पोस्टला रिप्लाय देताना आक्षेपार्ह रिप्लाय दिलेला होता. अकाऊंटवरून आक्षेपार्ह मजकूर लिहून शरद पवार यांचे फोटोसह ट्विट केल्याचे दिसले. सदर वेदश्री नावाने ट्विटर अकाउंटवर केलेल्या सदर पोस्टला राजे हर्षवर्धन शास्त्री या ट्विटर अकाउंट धारकाने त्याच्या अकाऊंटवरून वरील पोस्टला रिप्लाय देताना आक्षेपार्ह रिप्लाय दिलेला होता. त्यानंतर अजित कदम यांनी जाधव यांना ट्विटर अकाउंट मधील पोस्टचा स्क्रीन शॉट मोबाईल व्हाट्सअपवर पाठवला. गंभीर दखल घेत जाधव यांनी बारामती पोलिसांकडे फिर्याद दिली. बारामती पोलिसांनी तातडीने त्याची दखल घेत वेदश्री व राजे हर्षवर्धन शास्त्री या दोन ट्विटर अकाउंट धारकांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल केला.पुढील तपास बारामती तालुका पोलीस करीत आहेत.
No comments:
Post a Comment