अन्याय अत्याचारा विरोधात गरूड झेप घेण्यास दलित पँथर सज्ज - डाॅ.घनःशाम भोसले - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 22, 2021

अन्याय अत्याचारा विरोधात गरूड झेप घेण्यास दलित पँथर सज्ज - डाॅ.घनःशाम भोसले

*अन्याय अत्याचारा विरोधात  गरूड झेप घेण्यास दलित पँथर सज्ज - डाॅ.घनःशाम भोसले*
 
सातारा(दिनेश लोंढे):-दि.२२ - महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात दलित पँथर संघटनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढताना दिसत आहे. पुणे, अहमदनगर, भंडारा, बीड,नाशिक,रायगड जिल्ह्यातही इतर राजकीय पक्षांना मोठे खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दबदबा असलेले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डाॅ.घनःशाम भोसले यांच्या उपस्थितीत शेकडो  कार्यकर्त्याचा दलित पँथर सघंटनेत प्रवेश झाला.
     फलटण तालुक्यात दलित पँथरची नुकतीच बैठक पार पडली त्यात नूतन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. बैठकीला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  डाॅ.घनःशाम भोसले अध्यक्ष स्थानी उपस्थित होते. फलटण तालुका संपर्क प्रमुख पदी मंगेश इंगळे, फलटण तालुका संघटक पदी - अमोल शिलवंत,फलटण तालुका उपाध्यक्षपदी - बापुराव सावंत यांची निवड करण्यात आली तर झिरपवाडी छावणी शाखेच्या उपाध्यक्ष पदी - रत्नदिप  इंगळे,सरचटणीस पदी - किरणकुमार इंगळे, संघटक पदी -  महेश वायदंडे, उपाध्यक्षपदी - राधेश्याम इंगळे यांची निवड करण्यात आली यावेळी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेश गायकवाड, पुणे जिल्हा अध्यक्ष अंकुश आवाडे, इंदापुर तालुका अध्यक्ष सोमनाथ भोसले, सातारा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण काकडे, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख विराज भोसले, फलटण तालुका अध्यक्ष मंगेश आवळे, फलटण शहर अध्यक्ष आकाश काकडे तसेच बारामती तालुका अध्यक्ष गौरव अहिवळे, बारामती शहर अध्यक्ष शुभम गायकवाड, तसेच राहुल काकडे उपस्थित होते.
      कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. मास्क, तापमान, ऑक्सिजन पातळी तपासून, सॅनिटायझर देऊनच कार्यकर्त्याना प्रवेश देण्यात येत होता. अन्याय अत्याचार विरोधात पँथर गरूड झेप घेण्यास सज्ज असल्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डाॅ.घनःशाम भोसले यांनी यावेळी सांगितले. 
      दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांच्या नेतृत्वाखाली दलित पँथर चे काम अधिक प्रभावी होईल असा दावा दलित पँथरच्या उपस्थित असलेल्या शेकडो नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी केला.

No comments:

Post a Comment