विनाकारण फिरणारे नागरिक यांची रॅपीड अन्टीजेन तपासणी..नारायण शिरगावकर डी वाय एस पी. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 23, 2021

विनाकारण फिरणारे नागरिक यांची रॅपीड अन्टीजेन तपासणी..नारायण शिरगावकर डी वाय एस पी.


बारामती:-Lockdown कालावधीत विनाकारण फिरणाऱ्या लोकांना प्रतिबंध करण्यासाठी मा.श्री.दादासाहेब कांबळे, प्रांत, बारामती, मा.श्री. मनोज खोमणे, तालुका वैद्यकीय अधिकारी, बारामती व श्री. नारायण शिरगावकर, डी. वाय. एस.पी.बारामती यांच्या संकल्पनेतून कोविड केअर सेन्टर मेडीकल काॅलेज हाॅस्टेल बारामती (पंचायत समिती आरोग्य विभाग), नगरपालिका कर्मचारी यांच्या सहकार्याने व बारामती शहर व तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी यांना घेऊन अचानकपणे आज बारामती शहरातील विनाकारण फिरणारे नागरिक यांची रॅपीड अन्टीजेन तपासणी करण्यात आली.
 बारामती शहरातील *तीन हत्ती चौक* येथे 59 व्यक्ती यांची तपासणी केली पैकी 4 पाॅझीटीव्ह आले. तसेच *पेन्सिल चौक* येथे 66 व्यक्ती यांची तपासणी केली पैकी 8 पाॅझीटीव्ह आले. 
तसेच *सम्यक चौक* येथे 85 व्यक्तीची तपासणी केली असता त्यापैकी 2 पोझिटीव्ह आले.
सर्व पाॅझीटीव्ह यांना लगतच्या कोविड केअर सेन्टर येथे अॅडमीट केले आहे. एकुण तपासणी केली:-210 एकुण पाॅझीटीव्ह रुग्ण:- 14 डॉ. उपाध्याय व त्याची टीम, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण,पोलीस ठाण्याचे दुय्यम अधिकारी, स्टाफ ,RCP पथक यांनी अतिशय सुरेखपणे नियोजन करून कर्त्यव्य बजावले.उद्यापासून अचानक पणे बारामती तालुक्यात व शहरात अश्याच पद्धतीने कारवाई करण्यात येणार आहे.नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय विनाकारण बाहेर पडू नये. घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करावे.
असे आवाहन नारायण शिरगावकर,
डी.वाय. एस.पी.बारामती यांनी केले.

No comments:

Post a Comment