खरे कोरोना योद्धे कोण?जे पडद्याआड आहेत - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, April 10, 2021

खरे कोरोना योद्धे कोण?जे पडद्याआड आहेत

खरे कोरोना योद्धे कोण?जे पडद्याआड आहेत..                                                                            बारामती:-गेली एक वर्षे पेक्षा जास्त दिवस झाले कोरोनाच्या महामारीने संपुर्ण जगाला वेठीस धरले आहे, किती मेले, किती मरणाच्या वाटेवर आहेत, किती उपचार घेत आहे हे सांगणे कठीण झाले आहे अश्या परिस्थितीत मात्र प्रामुख्याने अश्या कोरोनावर उपाय योजना करण्यासाठी केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन, प्रशासन यासाठी जिकरीने प्रयत्न करीत आहे,डॉक्टर मोठ्या प्रमाणात उपचार करण्यासाठी जीवाची बाजी लावत आहेत तर पोलीस यंत्रणा आपल्या परीने कर्तव्य बजावत आहे, अश्या परिस्थितीत मात्र दुर्लक्ष होतंय ते म्हणजे हॉस्पिटलमध्ये काम करणारे कोविड सेंटर मधील आरोग्य कर्मचारी, नर्स  हे आपले काम प्रामाणिकपणे करत आहेत,स्वतःच्या कुटुंबातील लोकांचा विचार न करता अहोरात्र कोरोना ग्रस्त पेशंटची देखभाल करतात,तासोतास हे कर्मचारी रुग्णाची सेवा करतात स्वतःची जीवाची पर्वा न करता काम करून घरी गेल्यावर त्यांना काय अनुभव येतो तो त्यांनीच समजून घेवो, शेजारील व्यक्ती त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात त्यांच्या व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांपासून लांब लांब जातात,नातेवाईक हे दुरावले गेले अश्या वेळी त्यांच्या कुटुंबावर व त्यांच्या वर काय वेळ येत असेल हा अंदाज आपण करू शकता म्हणूनच खरे कोरोना योद्धे हेच म्हणले तर त्यांचा खऱ्या अर्थाने सन्मान होईल...

No comments:

Post a Comment