पारवडी येथे सामाजिक बांधिलकीतुन वनविभागातील प्राण्यांना व पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 1, 2021

पारवडी येथे सामाजिक बांधिलकीतुन वनविभागातील प्राण्यांना व पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय

पारवडी:- 1 मे कामगार दिनानिमित्त पारवडी(ता.बारामती) येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग रामदास शिपकुले यांच्या मार्फत वनविभागातील वनविभागाची परवानगी घेऊन प्राण्यांना व पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या दृष्टिकोनातून गट नं-461,462,463 या ठिकाणी 5000 लि.पाण्याचा टँकर कृत्रिम पाणवठ्या मध्ये सोडण्यात आला.पारवडी गावाला लगबग 450 हेक्टर वनक्षेत्र लाभलेले आहे.मागील महिन्यात ही 21 मार्च जागतिक वनदिनानिमित्त उंडवडी(ता.बारामती)या ठिकाणी 5000 ली पाणी पाणवट्यांन मध्ये सोडले होते.आशा प्रकारे आत्ता पर्यंत 10000 लि. पाणी वनविभागातील कृत्रिम पणवट्यान मध्ये सोडलेले आहे.या वेळी उपस्थित धनंजय शिंदे साहेब(पोलीस पाटील पारवडी -निंबोडी),अनिल काळंगे(वनविभाग कर्मचारी),मोहन होले(सामाजिक कार्यकर्ते),विजय गावडे तसेच पारवडी गावचे सरपंच खंडू भाऊ गावडे व उपसरपंच अनिल आटोळे, मिनाक्षी गुरव(वनविभाग अधिकारी),कवितके मॅडम(वनविभाग अधिकारी),ज्ञानदेव गावडे-पुजारी,बाळू दिवाने या सर्वांच सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment