*शेरसुहास मित्र मंडळाकडुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सात हजारांची मदत* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 4, 2021

*शेरसुहास मित्र मंडळाकडुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सात हजारांची मदत*

*शेरसुहास मित्र मंडळाकडुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सात हजारांची मदत*

बारामती दि.४: राज्यात कोरोना विषाणू विरोधात सुरु असलेल्या लढाईला बळ देण्यासाठी बारामती येथील शेरसुहास मित्र मंडळाचे संस्थापक आणि बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे व मंडळाचे सचिव मोहन अहिवळे यांच्या मार्गदर्शनानुसार ॲड.सुशिल अहिवळे,शुभम अहिवळे,नितीन गव्हाळे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून सात हजार रुपयांचा धनादेश तहसीलदार विजय पाटील,मुख्याधिकारी किरणराज यादव यांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे सुपूर्त केला.

राज्यातील जनता आणि प्रशासन कोरोना सारख्या महाभयंकर आजाराचा सामना करत असतानाच.देशभरातील आर्थिक विकास मंदावल्याने राज्यावर देखील आर्थिक संकट आले आहे.अशा या संकटाच्या काळात आपण आपल्या राज्यासोबत असायला हवे.या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सात हजाराचे आर्थिक सहाय्य करीत असल्याचे यावेळी ॲड.सुशिल अहिवळे व शुभम अहिवळे यांनी सांगितले.

या पूर्वी देखील राज्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटात नेहमी राज्या सोबत राहून शेरसुहास मित्र मंडळाने खारीचा वाट उचलला आहे.या आधी देखील मंडळाने कोविड काळात रक्तदान शिबीर घेतले होते.तर लॉकडाउन च्या काळात अनेक गरजू कुटुंबाना अन्नधान्याचे वाटप केले होते.तसेच कोल्हापूर सांगली येथील पूरग्रस्तांना आर्थिक मदतदेखील केली होती.अशा प्रकारे बारामती शहरात नेहमीच शेरसुहास मित्र मंडळाच्या वतीने विविध समाजपयोगी विधायक उपक्रम राबिवले जातात.

No comments:

Post a Comment