राष्ट्रसंत संनाजी महाराज जयंती घरीच साजरी करा - .श्री.हर्षद विनायक शिर्के पाटील - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 3, 2021

राष्ट्रसंत संनाजी महाराज जयंती घरीच साजरी करा - .श्री.हर्षद विनायक शिर्के पाटील


अहमदनगर :-  नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेना महाराज यांची 721वी जयंती 8 मे रोजी असून यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे व शासनाच्या आदेशामुळे साध्या पध्दतीने घरीच साजरी करण्याचे नाभिक सेवा संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख अहमदनगर मा.श्री.हर्षद विनायक शिर्के पाटील यांनी केले आहे. राष्ट्रसंत सेनाजी महाराज जयंती निमित्त दरवर्षी त्यांचे जन्मस्थळ बांधवगड ( मध्यप्रदेश ) येथे महाराष्ट्रासह विविध राज्यांतून बांधव जात असतात , परंतु मागील वर्षीपासून देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व शासनाच्या आदेशामुळे यावर्षी बांधवगड येथे जाता येणार नाही.   त्यामुळे प्रत्येक बांधवांनी 8 मे रोजी साध्या पध्दतीने आप-आपल्या कुटुंब कोरोना पासून सुरक्षित ठेवा.8 मे रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन संत साहित्याचे वाचन व मनन करावे.शक्य झाल्यास शासनाच्या आदेशाचे पालन करुन गोरगरीबांना धान्य वाटप करा , तसेच मुक्या प्राण्यांना चारा व पाणी द्यावे.तसेच कोरोना काळात आपले कर्तव्य बजावनारे पोलिस , डॉक्टर , नर्स , अंम्बुलंस व सफाई कर्मचारी यांच्या दिर्घायुष्यासाठी राष्ट्रसंत सेनाजी महाराज चरणी प्रार्थना करावी , असे आवाहन नाभिक सेवा संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख अहमदनगर मा.श्री.हर्षद विनायक शिर्के पाटील यांनी पत्राद्धारे सांगितले

No comments:

Post a Comment