मोक्का गुन्हयातील पाहिजे असलेला फरारी आरोपीच्या बारामती शहर गुन्हे शोध पथकाने आवळल्या मुसक्या - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, June 24, 2021

मोक्का गुन्हयातील पाहिजे असलेला फरारी आरोपीच्या बारामती शहर गुन्हे शोध पथकाने आवळल्या मुसक्या

मोक्का गुन्हयातील पाहिजे असलेला फरारी आरोपीच्या बारामती शहर गुन्हे शोध पथकाने आवळल्या मुसक्या
बारामती:- बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं-१२०/२०२१ भा.द.वी.क ३९५,३८४,मोक्का गुन्हयातील फरार आरोपी
नामे गणेश संजय बोडरे रा.सातववस्ती ता.बारामती जि पुणे हा व त्याचा जोडीदार नितीन तांबे हे दोघेही गुन्हा घडलेपासुन फरार होते त्यामुळे मा.पोलीस अधिक्षक .मा.अप्पर पोलीस अधिक्षक ,उपविभागिय पोलीस अधिकारी  व बारामती शहर पोलीस निरीक्षक यांनी गु्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे व त्याचे पथकाला वरील गुन्हयातील फरार आरोपी यंांना तात्काळ अटक करण्याचे लेखि आदेश केल्याने सदरचा फरार आरोपी नामे गणेश संजय बोडरे हा पुसेसावळी ता.मान जि.सातारा या परीसरात असलेचे खात्रीशीर बातमी गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक रूपेश साळुके यांना मिळालेने सदर ठिकाणी तात्काळ सापळा रचुन त्यास शिताफिने ताब्यात घेवुन पुढील कारवाईसाठी बारामती शहर पोलीस
स्टेशनला घेवुन आले आहे.पुढील कारवाई करत आहे.सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री. अभिनव देशमुख ,मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री.मिलींद मोहीते , यांचे मार्गदर्शनाखाली मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर ,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मयुर भुजबळ , पोलीस निरीक्षक श्री नामदेव शिंदे  यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे,सहायक फौजदार शिवाजी निकम,पोलीस नाईक रूपेश साळुके,पो.का तुषार चव्हाण,अकबर शेख, सुहास लाटणे,अतुल जाधव, दशरथ इंगोले,अजित राउत,अंकुश दळवी यांनी केली.

No comments:

Post a Comment