शरद पवार कुठे, तुम्ही कुठे याचे जरातरी भान ठेवा' हेमंत पाटील यांनी पडळकर यांना शेलक्या शब्दात फटकारले - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, July 3, 2021

शरद पवार कुठे, तुम्ही कुठे याचे जरातरी भान ठेवा' हेमंत पाटील यांनी पडळकर यांना शेलक्या शब्दात फटकारले

'शरद पवार कुठे, तुम्ही कुठे याचे जरातरी भान ठेवा' हेमंत पाटील यांनी पडळकर यांना शेलक्या शब्दात फटकारले

बारामती - गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या बिनबुडाच्या व्यक्तीने शरद पवारांविषयी बोलणे म्हणजे सूर्यावर शुंकण्यासारखे आहे. शरद पवार कुठे, तुम्ही कुठे याचे जरा भान ठेवा. ज्यांनी बेकायदा हातभट्टी दारू विकून समाजाला बरबाद करण्याचे काम केले, त्यांनी उंटाच्या... चा मुका घेण्याच्या भानगडीत पडू नये. अन्यथा पुन्हा हातभट्टी विकण्याची वेळ येईल, अशा शेलक्या शब्दात धनगर समाजाचे नेते व इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी पडळकर यांना फटकारले.बारामती येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोलापूर येथील दगडफेक प्रकरण हा
पडळकर यांचा बनाव असून त्यात पवार घराण्याला नाहक बदनाम करण्याचे कटकारस्थान पडळकर यांनी केले आहे. त्या बाबतीत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
गोपीचंद पडळकर हे किती ढोंगी व लबाड आहेत हे जनतेसमोर उघड करणार आहे. महादेव जानकर,विनोद तावडे, राजू शेट्टी अशा अनेक नेत्यांना फसवून ते देवेंद्र फडणवीस यांच्या दावणीला बांधले गेले आहेत. आता भाजपला फसवून ते स्वगृही परततील. अशा व्यक्तीची विश्वासार्हता काय, असा सवाल त्यांनी केला.पडळकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि विनोद तावडे यांच्या माध्यमातून ते भाजपमध्ये घुसून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ पोहचले.परत बिरोबाची शपथ घेऊन भाजपमधून बाहेर पडले आणि धनगर समाजाला वाऱ्यावर सोडले. अशा
महापराक्रमी गोपीचंद पडळकरयांच्याविषयी काय बोलावे, असा सणसणीतटोला त्यांनी लगावला.यावेळी हेमंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दांभिकपणावरही कोरडे ओढले. फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी ओबीसी आरक्षणाला विरोध केला. आता ते भाजपमधील ओबीसी नेत्यांची बैठक घेऊन
आरक्षण मागत आहेत हा दुटप्पीपणा त्यांनी बंद करावा. भाजपचे सरकार असताना धनगर समाजाच्या विकासासाठी १ हजार कोटी मंजूर केले. त्यापैकी किती धनगर समाजासाठी खर्च केले ते फडणवीस यांनी जाहीर करावे, असे आव्हान पाटील यांनी यावेळी दिले. धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे आणि ते आम्ही मिळवणारच, असा ठाम विश्वास पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

No comments:

Post a Comment