रविराज तावरे गोळीबार प्रकरण.. माजी सरपंच जयदीप तावरे अटक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 6, 2021

रविराज तावरे गोळीबार प्रकरण.. माजी सरपंच जयदीप तावरे अटक..

रविराज तावरे गोळीबार प्रकरण.. माजी सरपंच जयदीप तावरे अटक..                                       बारामती:- बारामती तालुका पोलीस स्टेशन हददीमध्ये दि. ३१/०५/२०२१ रोजी सायंकाळी ०६/४५ वा चे सुमारास मौजे माळेगाव
गावचे हददीत संभाजीनगर येथे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते रविराज तावरे यांचेवर माळेगाव येथील प्रशांत मोरे याचे टोळीने गोळीबार केला होता.त्याबाबत रविराज तावरे यांच्या पत्नी रोहीणी तावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन १) प्रशांत पोपटराव मोरे ,२)विनोद उर्फ टॉम पोपटराव मोरे  ३) राहुल उर्फ रिबल कृष्णांत यादव  ४) ( विधी रांघर्षग्ररत बालक) यांचे विरूध् महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाअन्वये गुन्हा दाखल करणेत आलेला असुन सर्व आरोपी सद्दा कारागृहात आहेत.
सदर गुन्हातील जखमी रविराज तावरे यांचा जबाब घेण्यात आला होता. त्यांनी त्यांचे जवाबामध्ये माळेगाव ब्रु.चे माजी सरपंच जयदिप दिलीप तावरे याचाही सदर गुन्हयात सहभाग असल्याचे सांगितले होते. पोलीस तपासामध्ये जयदिप तावरे याचा सदर गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झालेने त्यास काल रात्री माळेगाव बुद्धक येथुन अटक करण्यात आली असुन आज रोजी त्यास मोक्का कोर्ट पुणे येथे हजर केले असता त्यास दिनांक १४/०७/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे.सदरची कारवाई श्री.डॉ अभिनव देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण , श्री. मिलींद मोहीते अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग बारामती, श्री. नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती ,श्री
महेश ढवाण  पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन पोलीस हवालदार सुरेश भोई पोलीस नाईक सुरेश दडस,परिमल मनेर ,पोलीस अंमलदार विजय वाघमोडे ,नंदू जाधव, विनोद लोखंडे, राहुल पांढरे यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment