हॉटेलवर धुडगूस घालणाऱ्या बारा जनावर गुन्हा दाखल.. काऱ्हाटी : बारामती-मोरगाव रस्त्यालगत काऱ्हाटी येथील मल्हारराज हॉटेलवर बारा जणांच्या टोळक्याने धुडगूस घालून कोल्ड्रिंक्सच्या बाट्ल्या , खुर्च्या , सि.सि .टी व्ही. कॅमेरा स्क्रीन , हॉलच्या खिडक्यांच्या काचा फोडून मोठे नुकसान केले आहे . तसेच हॉटेलच्या वेटरच्या डोक्यात कोल्ड्रिंकच्या बाटल्या फोडल्या असल्याची घटना घडली .या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये हॉटेल च्या वेटरला मारहाण व नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .याबाबत सविस्तर वृत्त असे की बारामती-मोरगाव रस्त्यावरील काऱ्हाटी गावानजीक असणाऱ्या मल्हारराज हॉटेलवर काल दिनांक 3 रोजी सायंकाळी ६:४५ मिनिटांचा दरम्यान या ईंद्रजीत सोनवणे व नितीन खोमणे ईतर चार व्यक्तीसह हॉटेलमध्ये प्रवेश करून आम्हाला येथे जेवायला बसायचे आहे असे सांगितले . यानंतर हॉटेलचा वेटर कुमारपाल याने तुम्हाला येथे जेवता येणार नाही पार्सल घेऊन जाता येईल असे सांगितले यावर आरोपी नंबर 2 खोमणे याने मी इथलाच आहे तुम्हाला बघून घेतो असे सांगितले व निघून गेला.त्यानंतर ऱात्री ८: ४५ दरम्यान वरील दोन आरोपी व इतर दहा जणांच्या टोळक्याने हॉटेलच्या गेटवरुन उड्या टाकून प्रवेश केला . हॉटेल मधील खुर्च्यांचे मोठे नुकसान केले आहे .कोल्ड्रिंकच्या बाटल्या फोडल्या तसेच वेटरच्या डोक्यात कोल्ड्रिंक्स ची बाटली फोडली. तसेच मॅनेजरलाही मारहाण केली . सीसीटीव्ही कॅमेऱ्याची स्क्रीन फोडली असुन हॉलच्या काचाही फोडल्या याप्रकरणी हॉटेलचा मॅनेजर स्वप्नील राजेंद्र गायकवाड यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनुसार या हॉटेलमध्ये धुडगूस करणाऱ्या बारा जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.याबाबत पो.ह पाटमास करीत आहे.
Post Top Ad
Sunday, July 4, 2021
हॉटेलवर धुडगूस घालणाऱ्या बारा जनावर गुन्हा दाखल..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment