उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत महाआरोग्य शिबिर संपन्न - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 27, 2021

उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत महाआरोग्य शिबिर संपन्न

उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत महाआरोग्य शिबिर संपन्न


बारामती:-बारामती नगरी मधील देसाई इस्टेट  या ठिकाणी विनामूल्य महाआरोग्य शिबिर संपन्न झाले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती शहराचे कार्याध्यक्ष श्री विशाल पोपटराव जाधव व देसाई इस्टेट मित्र परिवाराच्या वतीने या विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या महा आरोग्य शिबिराच्या उद्घाटन समयी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार उपस्थित होते. त्यांच्यासमवेत बारामती नगरीच्या नगराध्यक्षा सौ पौर्णिमाताई तावरे,प्रशांत काटे,संभाजी होळकर ,सचिन सातव,इम्तियाज शिकीलकर,बाळु जाधव,अनिता गायकवाड,भाग्यश्री धायगुडे व इतर मान्यवर उपस्थित होते. या महाआरोग्य शिबिरा मध्ये ९ हॉस्पिटल्स चा समावेश होता. त्यामध्ये बालरोगतज्ञ, स्रीरोग तज्ञ, एमडी मेडिसिन, कार्डिओलॉजिस्ट, हृदय रोग तज्ञ, डेंटिस्ट, फिजिओथेरपिस्ट अशा अनेक डॉक्टरांचा समावेश होता. या शिबिराचा 600 लोकांनी लाभ घेतला. आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. आरोग्य व्यवस्थित राखायचे असेल तर रोज व्यायाम व प्राणायाम करणे आवश्यक आहे असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार म्हणाले. या शिबिराच्या निमित्ताने गरजू व गरीब लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल तसेच एकाच ठिकाणी अनेक आजारांवर निदान व उपचार करणारे डॉक्टर या महा आरोग्य शिबिराच्या निमित्ताने एकत्रित आणल्याबद्दल माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी श्री विशाल जाधव व मित्र परिवाराचे विशेष कौतुक केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.विशाल जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन शंकर घोडे (सर) यांनी केले.

No comments:

Post a Comment