*'संत निरंकारी मंडळाच्या वतीने आणेवाडी टोलनाक्यावर थांबलेल्या वाहनचालकांना जेवण वाटप*
बारामती - (प्रतिनिधी) संत निरंकारी मंडळ सातारा झोनच्या माध्यमातून सातारा झोनचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणेवाडी टोलनाक्यावर थांबलेल्या दोनशेहून अधिक वाहनधारकांना जेवणाचे डबे वाटप करण्यात आले.
महामार्गावर प्रचंड प्रमाणात पाणी साठल्याने कोल्हापूर, कर्नाटकला जाणारी वाहने प्रशासनाने अडविल्या होत्या. त्याचप्रमाणे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली होती.
कोल्हापूर, सांगली, निपाणी येथे पुणे बेंगलोर रस्ता महामार्गावर मोठ्याप्रमाणात पाणी साचल्याने, मुंबई पुण्याकडे येणारी वाहने साताऱ्यातील आणेवाडी टोलनाक्यावर तसेच खंडाळा, कराड येथे प्रशासनाकडून अडविण्यात आली होती.
आणेवाडी टोलनाक्यावर थांबलेल्या वाहनांची संख्या दोनशेहून अधिक असून यामध्ये मालवाहतूक तसेच खाजगी वाहनचालकांना संत निरंकारी मंडळ सातारा झोनच्या वतीने जेवणाचे प्याकेज वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संत निरंकारी मिशनचे ४० ते ५० सेवादल सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
No comments:
Post a Comment