वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आयोजित रक्तदान शिबिर १३१७ रक्तपिशवी संकलन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 22, 2021

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आयोजित रक्तदान शिबिर १३१७ रक्तपिशवी संकलन..

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आयोजित रक्तदान शिबिर १३१७  रक्तपिशवी संकलन..
वडगाव निंबाळकर :- पोलिस स्टेशन हद्दीत मा.डॉ.श्री.अभिनव देशमुख सो. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या संकल्पनेतून व श्री.मिलिंद मोहिते सो. अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग पुणे ग्रामीण तसेच मा.श्री.नारायण शिरगावकर सो.उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळ सर्व पत्रकार बांधव सर्व ग्रामपंचायत सर्व सामाजिक सेवाभावी संस्था, पोलीस पाटील होमगार्ड महिला दक्षता समिती तसेच नागरिकांच्या मदतीने वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन व अक्षय ब्लड बँक पुणे यांच्या सहकार्याने आज दि.२२ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात एकूण १३१७ रक्तदात्यांनी रक्तदान केलेले असून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडील ३ पोलीस अधिकारी व २५ पोलीस अंमलदार यांनी सुद्धा रक्तदान करून सक्रिय असा उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे.
          वडगाव निं.पोलीस स्टेशन हद्दीत आज रोजी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन (३६२), करंजेपुल दुरक्षेत्र (२८३), सुपा दुरक्षेत्र (२६०), पणदरे दुरक्षेत्र (२५८) व मोरगाव पोलीस मदत केंद्र (१५४) अशा एकूण ५ ठिकाणी एकूण १३१७ रक्तपिशवी संकलन झालेले आहे.   
        आज रोजी संपूर्ण पुणे जिल्ह्यात झालेले १४४५ रक्त पिशवी रक्त संकलन झालेले असून याव्यतिरिक्त फक्त वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आयोजित रक्तदान शिबिर १३१७  रक्तपिशवी संकलन झाले आहे.

No comments:

Post a Comment