लसीकरण केंद्राचे उद्घाटन संपन्न,सहारा फौंडेशनच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, September 11, 2021

लसीकरण केंद्राचे उद्घाटन संपन्न,सहारा फौंडेशनच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद.

लसीकरण केंद्राचे उद्घाटन संपन्न,सहारा फौंडेशनच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद.

    बारामती:-  बारामती मोरगाव रोड येथील,एकता इंग्लिश मीडियम स्कूल बारामती.या ठिकाणी सहारा फाउंडेशन च्या माध्यमातून लसीकरण केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले, याप्रसंगी उपविभागीय अधिकारी श्री दादासाहेब कांबळे, वैद्यकीय अधिकारी मनोज खोमणे, सिल्वर जुबली चे सदानंद काळे, सहयाद्री फाउंडेशन चे अध्यक्ष श्री संभाजी माने, माजी नगरसेवक अनिल कदम,मुस्लिम बॅंकेचे संचालक आलताफ सय्यद, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती हाजी कमरुद्दीन सय्यद, श्रीराम पतसंस्थेचे चेअरमन श्री विलास बोरावके, उद्योजक शेवंतीलाल दोशी, डॉक्टर संदेश शहा, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
      या लसीकरण केंद्रातून आज , मोरगाव रोड, सिकंदर नगर, खंडोबानगर तसेच कसब्यातील काही नागरिकांनी लसीकरण करून घेतले. एकूण 200 डोस आज देण्यात आले अशी माहिती सहारा फाउंडेशनचे अध्यक्ष परवेज हाजी कमरूद्दिन सय्यद यांनी दिली.

No comments:

Post a Comment