आत्ता प्रतीक्षा संपली..ओबीसी आरक्षणावरुन निवडणुका पुढे ढकलता येणार नाही : सर्वोच्चन्यायालय - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, September 11, 2021

आत्ता प्रतीक्षा संपली..ओबीसी आरक्षणावरुन निवडणुका पुढे ढकलता येणार नाही : सर्वोच्चन्यायालय

आत्ता प्रतीक्षा संपली..ओबीसी आरक्षणावरुन निवडणुका पुढे ढकलता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणाच्या मुद््यावर राज्यात आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकण्याबाबत जवळपास सर्वच पक्ष सकारात्मक आहेत. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. निवडणुका घेण्याचा आणि पुढे ढकलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, राज्य सरकारला नाही असं सर्वोच्च न्यायालयाने मत नोंदवलं आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील महानगर पालिका, नगर पालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत होण्याचा अंदाज आहे.

No comments:

Post a Comment