दोन गांजा तस्करांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ ने ताब्यात घेऊन त्यांचेकडुन १४,३५,०००/- कि.चा ७१ किलो ७५५ ग्रॅम गांजाचा साठा व टाटा अल्ट्रा टेम्पो केला जप्त...
पुणे:- पोलिस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहराचे पोलीस आयुक्त म्हणुन पदभार स्विकारले पासुन त्यांनी पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशिर धंदे करणारे, अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालविणारे गुन्हेगारांवर कठोर कारवाई करुन, त्यांचे कंबरडे मोडण्याचे ध्यास हाती घेतला असुन,त्या अनुषंगाने त्यांनी अंमली पदार्थ विरोधी पथक २ चे प्रभारी अधिकारी श्री प्रकाश खांडेकर पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले आहेत.त्यानुसार त्यांनी हाताखालील स्टाफला आदेश दिले होते दिलेल्या आदेशानुसार दिनांक ११/०९/२०२१ रोजी ०६/३० वाजण्याचे सुमारास अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार परिमंडळ ४ व ५ हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना त्यांचे गोपनिय खब-याकडुन मिळालेल्या माहिती वरुन जॉन डीअर महालक्ष्मी सर्व्हीस सेंटर चे समोर असलेल्या वाघोली लोहगाव रोडवर सार्वजनिक ठिकाणी एक टाटा अल्ट्रा १०१४ क्रमांक एम एच/१५/जी व्हि/७८०८ गाडीमधुन इसम नामे १) प्रविण बाळासाहेब वायसे वय ३१, धंदा - ड्रायव्हर रा. सिडको शिव चौक, घर.नं.एन/५१ ए.जि/१/११/१ उत्तमनगर नाशिक २) योगेश शशिकांत महाजन वय २५ वर्षे, धंदा - ड्रायव्हर रा.पाथर्डी फाटा पांडुरंग चौक, कृष्णाई बिल्डींग घर नं. ५, नाशिक अश्या दोन्ही इसमांकडे ७१ किलो ७५५ ग्रॅम इतक्या वजनाचा गांजा किंमत १४,३५.०००/-व टाटा अल्ट्रा १०१४ क्रमांक एम एच/१५/जी व्हि/७८०८ कि.रु. १८,००,०००/-
असा एकुण ३२,३५.०००/- रुपयांचा मुद्देमाल अनाधिकाराणे व बेकायदेशिर रीत्या जवळ बाळगताना मिळुन आल्याने नमुद दोन इसमांविरुध्द लोणीकंद पोलीस ठाणे येथे गु.र.नं.
(ii)(क).२९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास पोलीस उप- निरीक्षक दिगंबर चव्हाण हे करत आहेत./२०२१ एन.डी.पि.एस.अॅक्ट कलम८(क),२० (ब)
वरील नमुद कारवाई ही मा.प्रभारी अप्पर पोलिस आयुक्त,गुन्हे श्रीमती भाग्यश्री नवटके, मा.पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. श्रीनिवास घाडगे, मा.सहा पो आयुक्त,गुन्हे २ श्री लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, पो.उप-निरीक्षक दिगंबर
चव्हाण व पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, चेतन गायकवाड संदिप शेळके, महेश साळुंखे,युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड, महिला अंमलदार दिशा खेवलकर यांनी केली आहे.याबाबत सर्वत्र या टीमचे कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment