सांगवीत गुटखा घेऊन जाणाऱ्या वर पोलिसांची कारवाई.. सांगवी:- गुप्त माहितीच्या आधारे ता २४/०९/ २०२१ रोजी १२/०० वा मे सुमारास सपोनि घुगे,पो ह गायकवाड, पो हवा दळवी, पो ह लोखंडे यांनी कारवाई करण्याचे मा पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी आदेश दिल्याने पो हवा गायकवाड लागलीच दोन पंचाना पोलीस स्टेशन ला बोलावुन घेवून मिळालेल्या बातमीचा थोडक्यात माहिती देऊन रवाना होऊन खाजगी वाहन घेऊन मौजे सांगवी हदीत बारामती फलटण रोडवर हॉटेल साई येथे लावुन थाबले. काही वेळातच एक काळे रंगाचे पॅशन गाडीवर पाठीमागे पांढरे रंगाची बाधलेली पिशवी बारामती कडून फलटण कडे येताना दिसली त्यास पो कॉ वाघमोडे यांनी हात करून थांबविले त्याचे नाव नासीर मुसा शेख वय ४३ वर्ष रा सांगवी ता फलटण त्याच्या गाडीला बांधलेली पांढरे पिशवीची तपासणी केल्याने त्यामध्ये विक्रीसाठी चालविलेला गुटखा मोठया प्रमाणात आढळून आला असता त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून गुन्हा दाखल केला असून तपास चालू असून आणखी कोण यामध्ये आहे का याचा शोध चालू असून लवकरच पोलिसांच्या हाथी यामागचा सूत्रधार सापडेल असे सांगण्यात आले.हा गुटखा नक्की कुणाकडून आणला त्याच्या पर्यंत पोलीस पोहचतील का हे लवकरच कळेल.
Post Top Ad
Sunday, September 26, 2021
सांगवीत गुटखा घेऊन जाणाऱ्या वर पोलिसांची कारवाई..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment