खळबळजनक..तहसीलदारावरच लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, October 23, 2021

खळबळजनक..तहसीलदारावरच लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल..

खळबळजनक..तहसीलदारावरच लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल..
 पैठण : पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यासह खासगी व्यक्ती नारायण वाघ याने लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने महसुल
विभागात खळबळ माजली आहे.वाळूचा व्यवसाय करणारे तक्रारदार भागीदारीत शेती करतात. अतिवृष्टीमुळे तक्रारदाराच्या
भागीदारीतील शेतात नदीतील वाळूचा साठा तयार झाला आहे. या वाळूचा उपसा व वाहतूक करण्यासाठी आरोपी वाघ याने पंचांसमक्ष 1 लाख 30 हजार रुपयांची हप्ता स्वरुपात मागणी केली.तहसीलदार शेळके यांच्या चेंबरमधे पंचांसमक्ष या लाचेला समर्थन व प्रोत्साहन देण्यात आले.याप्रकरणी तहसीलदार शेळके, नारायण वाघ अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत खळबळ उडाली असून चक्क तहसीलदारच सापडत असेल तर इतर अधिकारी काय काय करीत असतील याची उलट सुलट चर्चा सुरू आहे.

No comments:

Post a Comment