हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीचे औचित्य साधून कासम कुरेशी यांचेकडून अन्नदान वाटप... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 19, 2021

हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीचे औचित्य साधून कासम कुरेशी यांचेकडून अन्नदान वाटप...

हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीचे औचित्य साधून कासम कुरेशी यांचेकडून अन्नदान वाटप...                                                                                बारामती:- संपूर्ण जगाला शांती आणि समतेचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीची जल्लूस यात्रा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली होती,यावेळी बारामती मध्ये विविध धार्मिक स्थळी अन्नदान वाटप व रक्तदान करण्यात आले याच अनुशंगाने पीर चांदशावली दर्गा येथे सामाजिक कार्यकर्ते कासम कुरेशी व हॉटेल साहेब यांच्या संयुक्त विध्यमाने अन्नदान करण्यात आले यावेळी हाजी मौलाना बाबा यांनी प्रार्थना केली यादरम्यान बारामती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, नगरसेवक गणेश भाईजी सोनवणे, नगरसेवक कुंदन लालबिगे,हाजी जनाब युसुफभाई मुजावर, पत्रकार संतोष जाधव,फैयाज शिकीलकर,इकबाल सेगावाले सह मान्यवर उपस्थित होते, यादरम्यान पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी बोलताना म्हटले की आपण शांत व नियमांचे पालन करून जल्लूस यात्रा न काढता जयंती विविध उपक्रमांनी साजरी करताय हा एक चांगला आदर्श आहे, कासम कुरेशी यांनी आपल्या व्यवसायाला कलाटणी देऊन हॉटेल व्यवसायात लक्ष घालून परिवर्तन घडविले त्याबद्दल त्यांचे कौतुक केले,आपल्या समाजात मुलांना शिक्षण देऊन मोठे अधिकारी बनवा असे अनेक मोलाचे मार्गदर्शन केले.कासम कुरेशी यांनी सामाजिक बांधिलकीतुन गेले वीस वर्षे विविध उपक्रमांनी अनेक कुटुंबाना आधार दिला, अनाथ आश्रम मधील मुलांना ब्लॅंकेट सतरंजी खाऊ वाटप तसेच उपयोगी वस्तू वाटप केल्या तर कित्येक जणांचे लग्न करून देणे त्यांचे संसार उपयोगी वस्तू देऊन सहकार्य केले असे अनेक मंडळ,संस्थेच्या कार्यक्रमला मदत करीत आले, अनेक संकटावर मात करीत सामाजिक बांधिलकी जोपासत असणारे कासम कुरेशी यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

No comments:

Post a Comment