सराईत चंदन चोरांना माळेगाव पोलिसांनी घेतले ताब्यात - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 29, 2021

सराईत चंदन चोरांना माळेगाव पोलिसांनी घेतले ताब्यात

*सराईत चंदन चोरांना माळेगाव पोलिसांनी घेतले ताब्यात *

बारामती:- दि.28 आज रोजी बारामती तालुक्यातील माळेगाव बु पोलीस चौकीचे सहा पो नि राहूल घुगे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, इसम नामे सचिन भोसले हा माळेगाव खुर्द रोड, पाण्याचे टाकी जवळ चंदन विक्रीसाठी घेऊन थांबला आहे. अशी बातमी मिळताच स पो नि घुगे , सोबत पो हवा शाशिकांत वाघ, पो ना दत्तात्रेय चांदणे, पो शी प्रशांत राऊत , पो शी दीपक दराडे यांनी घटनास्थळी छापा टाकून आरोपीस ताब्यात घेतले आहे.

1)सचिन दीक्षित भोसले, वय 28, रा. राजवाड्याच्या पाठीमागे माळेगाव बु ता बारामती, पुणे  2) ऋषिकेश सुदाम पवार वय 19, रा नागतळे, माळेगाव बु, 3) राजेंद्र लक्ष्मण कुचेकर उर्फ पप्या , वय 25 रा नागतळे, माळेगाव बु आरोपींची नावे असून त्यांच्या कडून तब्बल 48 किलो 400 ग्रॅम अंदाजे किंमत रु. १७,०००/_  चे कच्चे चंदन मिळून आले असून सदर आरोपीना पुढील कारवाई करिता वन परीक्षेत्र अधिकारी बारामाती वन विभाग यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 
      सदरची कामगीरी बारामती तालुका पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री महेश ढवाण सो यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्री राहुल घुगे, पो हवा शाशिकांत वाघ, पो ना दत्तात्रेय चांदणे, पो शी प्रशांत राऊत , पो शी दीपक दराडे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment