पुरवठा विभागात खासगी पंटर कार्यरत (रेशनचा महाघोटाळा)... बारामतीत कोणत्या विभागात चालु आहे घोटाळा..पोलखोल लवकरच. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, October 25, 2021

पुरवठा विभागात खासगी पंटर कार्यरत (रेशनचा महाघोटाळा)... बारामतीत कोणत्या विभागात चालु आहे घोटाळा..पोलखोल लवकरच.

पुरवठा विभागात खासगी पंटर कार्यरत (रेशनचा महाघोटाळा)...                            बारामतीत कोणत्या विभागात चालु आहे घोटाळा..पोलखोल लवकरच.
धरणगाव:- पुरवठा विभागात खासगी पंटर कार्यरतअसून धरणगाव तालुक्यात रेशनचा महाघोटाळा तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांची मिलीभगत आहे,धरणगाव तालुक्याचे तहसीलदार नितीन कुमार देवरे यांचा आणि पुरवठा अधिकारी एस.जी.घुले यांचा ३६ चा आकडा आहे. दोघांचे हि सूर जुळत नहीत. पुरवठा अधिकारी यांचा उर्मट स्वभाव यासाठी कारणीभूत असल्याचे सूत्रांकडून कळते. जिल्हा पुरवठा अधिकारी हे देखील घुले यांच्या कामावर समाधानी नाहीत. कारण संपूर्ण तालुक्याच्या पुरवठा विभाग घुले यांच्या अखत्यारीत आहे. घुले यांनी यावर एक हाती नियंत्रण ठेवले आहे. पुरवठा अधिकारी तसेच गोडाऊन मैनेजर असा दुहेरी पदभार ते गेल्या कित्येक वर्षांपासून
सांभाळत आहेत.एस जी घुले यांना धरणगाव रुचत नसल्याचे आव ते आणत असतात. मात्र याठिकाणी सुरु असलेली त्यांची कमाई त्यांना धरणगाव सोडू देत नाही. धरणगाव हुन बदली झाल्यानंतर देखील त्यांना धरणगाव हून का काढण्यात आले नाही ? हे मात्र कळू शकले नाही.याउलट त्यांना गोडाऊन चा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. जळगावहून ये-जा करणारे हे महाशय पुरवठा विभागाच्या कार्यालयात थांबतच नहीत.नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी याठिकाणी सक्षम अधिकारीच उपलब्ध नसतो. कार्यालयातील लिपिक वर्ग नागरिकांना अरे रावी करतात. सौजन्याने वागत नहीत.अशी तक्रार सामान्य जनतेतून होतांना कायमच दिसून येते.खासगी पंटर कार्यरत याठिकाणी एक खासगी पंटर गेल्या १० -१२ वर्षांपासून बिन पगारी फुल अधिकारी म्हणून कार्यरत आहे. संजय नावाच्या या व्यक्तीकडे २४ तास या विभागाची जबाबदारी असते. कोणती फाईल कुठे आहे. कोणाचे काय काम आहे ? कोणाकडून किती घ्यायचे ? कोणी किती दिले ? याचा सर्व हिशेब या व्यक्तीकडे असतो.विशेष म्हणजे पुरवठा विभागाचा हा 'विशेष पुरवठा
अधिकारी' च म्हणावा असा हा खासगी पंटर याठिकाणी वावरतांना दिसून येतो.एव्हढेच नव्हे तर एक खासगी इसम आनंद वाणी हा देखील शासकीय गोडाऊन येथे कायमस्वरूपी
कर्मचार्यासारखी सेवा बजावत असल्याचे दिसत आहे.

No comments:

Post a Comment