भाजपचे किरीट सोमय्या आज बारामती दौऱ्यात कोणावर साधणार निशाणा?चर्चांना उधाण... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 5, 2021

भाजपचे किरीट सोमय्या आज बारामती दौऱ्यात कोणावर साधणार निशाणा?चर्चांना उधाण...

भाजपचे किरीट सोमय्या आज बारामती दौऱ्यात कोणावर साधणार निशाणा?चर्चांना उधाण...
                                                                      बारामती:- काही दिवसांपासून बारामती मध्ये उलट सुलट चर्चा चालू होती की, किरीट सोमय्या बारामतीत येऊच शकत नाही पण आत्ता मात्र येणार नाही, येणार नाही म्हणणाऱ्या काही जणांच्या भुवया उंचावल्या आहे ते आज भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे बुधवारी (दि.6 ) शरद पवारांच्या बारामती येथे दौऱ्यावर येत आहेत. मागील काही दिवसांपासून यांनी विविध राजकीय नेत्यांना ज्या प्रकारे लक्ष्य केले आहे, ते पाहता त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते आल्यानंतर किरीट सोमय्या काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून चर्चाना उधाण आले आहे.प्रादेशिक परिवहन अधिकारी असलेल्या खरमाटे यांच्या मालमत्तेची पाहणी करण्यासाठी ते बारामतीत येत असले तरी किरीट सोमय्या बुधवारी साताऱ्याहून कोरेगाव मार्गे जरंडेश्वर कारखान्यावर जाणार आहेत. यांच्या मालमतत्तेची पाहणी करण्यासाठी ते बारामतीत येत असले तरी या निमित्ताने ते कोणावर निशाणा साधणार याबाबत उत्सुकता लागली आहे.याठिकाणी ते शेतकर्यांशी संवाद साधणार
आहेत.त्यानंतर पुसेगाव मार्गे डिस्कळ वरुन ते फलटण येथे खासदार रणजित नाईक निंबाळकर घरी जाणार आहेत. फलटण येथून दुपारी दोनच्या सुमारास बारामतीत येणार आहेत.याठिकाणी खरमाटे यांच्या जागांची पाहणी करुन ते बारामतीच्या भाजप कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.त्यानंतर ते भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून सायंकाळी जेजुरीत जाऊन खंडोबाचे दर्शन घेणार आहेत.त्यानंतर रात्री आठ वाजता फुरसुंगी येथे जाणार आहेत.अशी मिळाली आहे.

No comments:

Post a Comment