बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सोनसाखळी चोरी वर आळा.. बारामती:- बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सोनसाखळी चोरी वर आळा घालण्यासाठी पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके व पोलीस अमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदाळे पोलीस हवालदार शिंदे पोलीस नाईक कोळेकर पवार पोलीस कॉन्स्टेबल कोठे पोलीस कॉन्स्टेबल इंगोले यांना बारामती शहरांमध्ये पेट्रोलिंग करत असताना माळावरची देवी ते जळोची कडे जाणारे रोडवर अंधारात एक इसम एका मोटारसायकलवर संशयित फिरत असल्याचे दिसत असल्याने सदर इसमास जागीच पाडून त्याच्याकडे चौकशी करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्याचा पोलीस स्टेशन येथे आणून चौकशी केली असता त्याचे नाव निलेश गणेश मोरे वय 22 वर्ष राहणार खंडोबानगर असे सांगितले त्याच्याकडे मिळून आलेला सॅमसंग कंपनीचा जे सेवन मोबाईल हँडसेट मिळून आला सदर मोबाइल हँडसेट हा बारामती पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 597 2021 कलम 392 मधील असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले असून सदर इसमाकडे मिळवून आलेली युनिकॉर्न मोटरसायकल ही इंदापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 947 पब्लिक 2120 कलम 379 मधील असल्याचे निष्पन्न झाले आहे सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिलिंद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली मा उपविभागीय पोलिस अधिकारी श्री गणेश इंगळे , पोलीस निरीक्षक श्री सुनील महाडिक बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके व पोलीस अमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदाळे पोहे का शिंदे पोना कोळेकर पोका कोठे, इंगोले , पवार ,कोकणे यांनी केली सध्या दिवाळी हा सण असल्याने बारामती शहरातील सर्व नागरिकांनी योग्य ती दक्षता घेणे बाबत पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी नागरिकांना आवाहन केलेले आहे.
Post Top Ad
Sunday, October 31, 2021
बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सोनसाखळी चोरी वर आळा..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment