S.T बस सेवा पुन्हा सुरू करा | सम्यक विद्यार्थी आंदोलनची बारामती आगर प्रमुखांकडे मागणी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 12, 2021

S.T बस सेवा पुन्हा सुरू करा | सम्यक विद्यार्थी आंदोलनची बारामती आगर प्रमुखांकडे मागणी

S.T बस सेवा पुन्हा सुरू करा | सम्यक विद्यार्थी आंदोलनची बारामती आगर प्रमुखांकडे मागणी


  बारामती:-   कोरोना च्या काळात प्रथम लॉकडाऊन पडल्यापासून ते आजपर्यंत बऱ्याच गावांतील बंद केलेली S.T बस सेवा अजुन देखील बारामती आगराकडून सुरू करण्यात आलेली नाही. जवळपास एक ते दिड वर्ष झाले ही बस सेवा पूर्णतः बंद आहे. या बंद करण्यात आलेल्या सर्व बस सेवा पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने बारामती आगर प्रमुखांकडे करण्यात आली. 
             सध्या महाराष्ट्र सरकारने सर्व शाळा व महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार बारामतीतील जवळपास सर्वच शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आलेली आहेत. S.T बस सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना कॉलेज ला ये-जा करण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. ते खाजगी वाहन चालक त्यांच्या मर्जी नुसार ज्यादा दर आकारात आहेत. ते दर विद्यार्थ्यांना परवडत नसल्याने त्यांना इतर पर्यायांचा वापर करावा लागत आहे. प्रसंगी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे.    विद्यार्थ्यांची ही अडचण सोडवण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या वतीने S.T बस सेवा सुरू करण्याची मागणी सुरवातीपासूनच लावून धरलेली आहे. S.T बस सेवा तात्काळ सुरू न केल्यास प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना घेवून बारामती आगरा समोर तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा सम्यक चे बारामती तालुका अध्यक्ष रोहित भोसले यांनी दिला 
             शक्य होईल तेवढ्या लवकर बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन बारामती आगर S.T कामगार संघटनेचे अध्यक्ष विकास भोसले यांनी दिले. यावेळी बारामती आगारातील झांबरे साहेब, सुजाता पानसरे  मॅडम, विकास सावंत आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे बारामती तालुका अध्यक्ष रोहित भोसले, टी.सी कॉलेजचे सदस्य विश्वजित कदम तसेच आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment