बारामती:- राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज बारामती नगरपरिषद कार्यालया समोर,जळोची मधे कोव्हीड 19 विरहीत पर्यायी स्मशानभूमी चे बांधकाम करणे बाबत आज ठिय्या आंदोलन करण्यात आले व कुञीम प्रेताला अग्नी देऊन नगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला, आज क्रृञीम प्रेताचे दहण नगरपरिषद कार्यालया समोर करण्यात आले, आमच्या मागणीची दखल घेतली गेली नाही तर येथुन पुढे जळोची गावातील मयत झालेल्या प्रेताचे नगरपरिषद कार्यालया समोर त्या प्रेताला अग्नी देऊ असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देण्यात आला,या वेळी नगरपरिषदेचे मुख्यधीकारी यांना निवेदन देण्यात आले, या वेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते संदीप चोपडे तालुका अध्यक्ष अँड.अमोल सातकर, चंद्रकात वाघमोडे, महादेव कोकरे, रेवण कोकरे,अविनाश मासाळ,किशोर सातकर,शैलेष थोरात ,निखील दांगडे, सुधीर वाघमोडे,प्रमोद धायगुडे,निलेश सातकर,करण गोसावी,भुषण सातकर,आदी उपस्थित होते..
Post Top Ad
Thursday, November 11, 2021
Home
ताज्या घडामोडी
बारामती
कोव्हीड 19 विरहीत पर्यायी स्मशानभूमी चे बांधकाम करणे बाबत रासपचे ठिय्या आंदोलन
कोव्हीड 19 विरहीत पर्यायी स्मशानभूमी चे बांधकाम करणे बाबत रासपचे ठिय्या आंदोलन
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment