आरोग्य निरीक्षकास लाच घेताना रंगेहाथ लाचलुचपत विभागाने पकडले... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, November 11, 2021

आरोग्य निरीक्षकास लाच घेताना रंगेहाथ लाचलुचपत विभागाने पकडले...

आरोग्य निरीक्षकास लाच घेताना रंगेहाथ लाचलुचपत विभागाने पकडले...                        पुणे:- महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकास लाच घेताना प्रतिबंधक विभागाने  गुरुवार दुपारी रंगेहाथ पकडले आहे. कचरा गोळा करणार्या एकाने तक्रार दिल्यानंतर अॅन्टी करप्शन
विभागाने ही कारवाई केली आहे. मनपाच्या आरोग्य निरीक्षकाने डयुटी ठराविक ठिकाणी देण्यासाठी 5 हजाराची लाच घेतल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.आरोग्य निरीक्षकास पुण्याच्या लाचलुचपत लाच घेतला पकडले स्वप्नील कोठवळे असे लाच घेणाच्या आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे.कचरा गोळा करणार्यांना ठराविक ठिकाणी डयुटी देण्यासाठी कोठावळेंनी लाचेची मागणी केली होती.तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार केली होती.प्राप्त तक्रारची शहानिशा करण्यात आली.पुण्याच्या अॅन्टी करप्शनच्या पथकाने आज सापळा रचला होता.त्यांनी आरोग्य निरीक्षक स्वप्नील कोठावळेंनी पंचासमक्ष 5 हजार रूपयांची लाच घेतली आहे.आरोग्य निरीक्षकाने लाच घेतल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे अप्पर अधीक्षक सुरज गुरव   अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा एससीबीच्या पथकाने केली आहे.
लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास यांच्या
मार्गदर्शनाखाली त्याबाबत अॅन्टी करण्शनकडे तक्रार द्यावी असे आवाहन पुणे अॅन्टी करपशनकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment