*एसटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी चाललेल्या उपोषणाला व संपाला बारामती भाजपचा पाठिंबा*...
बारामती:- दिवाळीपासून महाराष्ट्रातील एसटी कामगारांनी आपल्या मागण्यासाठी व न्याय हक्कासाठी पुकारलेल्या संपाला मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे, अनेक वर्ष आंदोलन करूनही पदरात काहीच न पडल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून एसटी कामगार प्रचंड हलाखीचे जीवन जगत आहेत. सगळीकडे महागाई वाढत असताना पंधरा ते वीस हजार तुटपुंजा पगारवरती एसटी कामगारांना जगणे मुश्किल होत चाललेले आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी मोठी सेवा देणाऱ्या एसटी कामगारांना स्वतःचा प्रपंच मात्र अतिशय अडचणीत आलेले चित्र आहे. एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये सहभागी करून घेऊन इतर कामगाराप्रमाणेच आम्हालाही सवलती मिळाव्यात या अतिशय रास्त मागण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एक लाख सात हजार असणारे एस टी कामगार अतिशय ताकतीने व शक्तीने रस्त्यावर आलेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जवळजवळ सर्वच 256 ठिकाणी एसटी डेपो बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे एसटी प्रवाशांचे हाल अतिशय मोठ्या प्रमाणात होत आहेत.
लालपरी बंद असल्यामुळे महाराष्ट्राची रक्तवाहिनी बंद पडल्यासारखी परिस्थिती आहे. बारामतीतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एसटी कामगारांना पाठिंबा देतच आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमच्या दुःख वेदना आम्हाला लक्षात आल्या आहेत त्यामुळे मागे काही चुका झाल्या असल्यातरी आता मात्र तुम्ही न्याय घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही अशाप्रकारचा पाठिंबा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना दिला आहे. तुम्ही मागितल्याशिवाय काहि मिळणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. विषेस म्हणजे कोणत्याहि नेत्याशिवाय व संघटनेशिवाय हे आंदोलन तीव्र होत चालले आहे, त्यामुळे लवकरात लवकर राज्य शासनाने एसटी कामगारांच्या आंदोलनाचा व मागण्याचां विचार करून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाचा विचार करून कोणते राजकारण न आणता एसटी कामगारांची मागणी पूर्ण करावी असी भाजपा पार्टीची राज्य शासनाला विनंती आहे. यावेळी एसटी कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे व दिलीप खैरे यांनी मार्गदर्शन केले.
भाजपाचे पुणे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, माजी सभापती मार्केट समिती दिलीपराव खैरे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद देवकाते, तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, शहराध्यक्ष सतीश फाळके, सुधाकर पांढरे, सचिन साबळे, प्रमोद डिंबळे,व रघु चौधर असे भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
,
No comments:
Post a Comment