हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीचे औचित्य साधून कासम कुरेशी यांचेकडून गेली पाच शुक्रवार अन्नदान वाटप... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, November 5, 2021

हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीचे औचित्य साधून कासम कुरेशी यांचेकडून गेली पाच शुक्रवार अन्नदान वाटप...

हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीचे औचित्य साधून कासम कुरेशी यांचेकडून गेली पाच शुक्रवार अन्नदान वाटप...                                                                                         बारामती:- संपूर्ण जगाला शांती आणि समतेचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीची जल्लूस यात्रा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली होती,यावेळी बारामती मध्ये विविध धार्मिक स्थळी अन्नदान वाटप करण्यात आले याच अनुशंगाने पीर चांदशावली दर्गा येथे व  कुरेशी जामा मस्जिद येथे सामाजिक कार्यकर्ते कासम कुरेशी व हॉटेल साहेब यांच्या संयुक्त विदयमाने अन्नदान करण्यात आले गेली पाच शुक्रवार हा उपक्रम चालू होता व आज पाचवा शुक्रवार असल्याने अन्नदान करून  सर्वांना आशीर्वाद व सुखसमृद्धी लाभो अशी प्रार्थना करण्यात आली यावेळी  हाजी मौलाना बाबा यांनी प्रार्थना केली यादरम्यान हाजी जनाब युसुफभाई मुजावर,साबीर कुरेशी, मुक्तार कुरेशी, वसीम नजीर कुरेशी, समीर कुरेशी, शहबाज कुरेशी, अरबाज कुरेशी, मेहबूब कुरेशी, असिफ कुरेशी, मोबिन कुरेशी, सलाम कुरेशी, तालिब कुरेशी,  गौस मकबूल कुरेशी, टिपू मकसूूूद कुरेशी, ईनुस मुजावर फिरोज सय्यद(क्वॉलिटी) यांनी सहकार्य केले होते, पत्रकार संतोष जाधव,फैयाज शिकीलकर,इकबाल सेगावाले,सह मान्यवर उपस्थित होते, शांत व नियमांचे पालन करून जल्लूस यात्रा न काढता जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली हा एक चांगला आदर्श आहे, कासम कुरेशी यांनी आपल्या व्यवसायाला कलाटणी देऊन हॉटेल व्यवसायात लक्ष घालून परिवर्तन घडविले त्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले,कासम कुरेशी यांनी सामाजिक बांधिलकीतुन गेले वीस वर्षे विविध उपक्रमांनी अनेक कुटुंबाना आधार दिला, अनाथ आश्रम मधील मुलांना ब्लॅंकेट सतरंजी खाऊ वाटप तसेच उपयोगी वस्तू वाटप केल्या तर कित्येक जणांचे लग्न करून देणे त्यांचे संसार उपयोगी वस्तू देऊन सहकार्य केले असे अनेक मंडळ,संस्थेच्या कार्यक्रमला मदत करीत आले, अनेक संकटावर मात करीत सामाजिक बांधिलकी जोपासत असणारे कासम कुरेशी यांनी हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीचे औचित्य साधून पाच शुक्रवारी हा अन्नदान सारखा कार्यक्रम करून भक्तिभाव दाखवून दिला.

No comments:

Post a Comment