निरगुडे, लकडेवस्ती येथील वडीलोपार्जीत जागेचे वहीवाटीचे कारणावरून लोखंडी गजाने व लाकडी दांडक्याने वयोवृध्द इसमास मारहाण करून खुन करणारे आरोपींना भिगवण पोलीस व स्था.गु.अ.शाखा,पुणे ग्रामीण यांनी १२ तासाचे आत २ आरोपींना घेतले ताब्यात... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, November 5, 2021

निरगुडे, लकडेवस्ती येथील वडीलोपार्जीत जागेचे वहीवाटीचे कारणावरून लोखंडी गजाने व लाकडी दांडक्याने वयोवृध्द इसमास मारहाण करून खुन करणारे आरोपींना भिगवण पोलीस व स्था.गु.अ.शाखा,पुणे ग्रामीण यांनी १२ तासाचे आत २ आरोपींना घेतले ताब्यात...

निरगुडे, लकडेवस्ती येथील वडीलोपार्जीत जागेचे वहीवाटीचे कारणावरून लोखंडी गजाने व लाकडी दांडक्याने वयोवृध्द इसमास मारहाण करून खुन करणारे आरोपींना भिगवण पोलीस व स्था.गु.अ.शाखा,पुणे ग्रामीण यांनी १२ तासाचे आत २ आरोपींना घेतले ताब्यात...
बारामती/भिगवण:- दिनांक. ०४/११/२०२१ रोजी सायं ५:०० वा चे सुमारास मौजे निरगुडे लकडेवस्ती येथील मारूती मंदीराचे समोर निरगुडे गावातील वडीलोपार्जीत गामपंचायत मिळकती मधील जागेचे वहीवाटीचे कारणावरून इसम नामे १) नारायण ज्ञानदेव लकडे, २) दत्तु ज्ञानदेव लकडे,३) ज्ञानदेव कृष्णा लकडे,४) अमर दत्तु लकडे, ५) तनमय नारायण लकडे, ६) शुभम नारायण लकडे, ७) पारूवाई ज्ञानदेव लकडे, सर्व रा. निरागुडे, लकडेवस्ती, ता. इंदापुंर, जि.पुणे यांनी बेकायदेशीर जमाव जमवुन त्यांचा चुलत
चुलत भाऊ मारूती गणपत लकडे, वय ८५ वर्ष,व त्यांचा मुलगा शिवाजी मारूती लकडे, व नातु श्री.
बाळु शिवाजी लकडे, वाल्मीक शिवाजी लकडे, सर्व रा. निरगुडे, लकडेवस्ती, ता.इंदापुर, जि.पुणे यांना लोखंडी गजाने, लाकडी दांडक्याने, दगडाने मारहाण करून त्यांचेतील मारूती गणपत लकडे यांचे डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी करून त्यांचा खुन केला आहे तसेच शिवाजी मारूती लकडे, बाळु शिवाजी लकडे,वाल्मीक शिवाजी लकडे, यांना पण मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. सदर बाबत श्री.बाळु शिवाजी लकडे, वय. ३५ वर्ष, रा.निरगुडे, लकडेवस्ती, ता.इंदापुर,जि.पुणे, यांनी तकार दिली असुन त्याबाबत भिगवृण पोलीस स्टेशन येथे गुन्हा.रजि.नंबर.२८३/२०२१, भा.द.वि.कलम.३०२, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे दिनांक.०५/११/ २०२१ रोजी ०३:०९ वा गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास चालु आहे. सदर गुन्हयातील दोन आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असुन सदर गुन्हयातील उर्वरीत आरोपी यांचा शोध
घेणे कामी तीन टिम तयार करून आरोपीचा शोध घेणेकामी रवाना करण्यात आल्या असुन आरोपींचा शोध चालु आहे.सदरची कामगिरी मा. डॉ.अभिनव देशमुख  , पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण मा.मिलींद मोहीते, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, मा. गणेश इंगळे , उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती विभाग, मा.अशोक शेळके , वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्था.गु.अ.शाखा, पुणे
ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली दिलीप पवार, सहा. पोलीस निरीक्षक, भिगवण पो.स्टे, संदीप येळे, सहा.पोलीस.निरीक्षक, स्था.गु.अ.शाखा, पुणे ग्रामीण, भिगवण पो.स्टेचे पोसई विनायक दडस पाटील, रूपेश कदम, पोलीस अंमलदार रामदास जाधव, अंकुश माने, महेश उगले, सचिन निकम, सचिन पवार,मुलाणी, आप्पा भंडलकर तसेच स्थागुअ शाखचे अनिल काळे, रविराज कोकरे, काशिनाथ राजापुरे, राजु मोमीण, अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment