एस टी कर्मचारी आंदोलनास मनसेचा पाठिंबा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 9, 2021

एस टी कर्मचारी आंदोलनास मनसेचा पाठिंबा..

एस टी कर्मचारी  आंदोलनास मनसेचा पाठिंबा..
बारामती:- राजसाहेब ठाकरे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे आदेशानुसार, सध्या एस.टी महामंडळाचे राज्यशासनात विलीनीकरनाच्या मागणीसाठी चालू असलेले कर्मचारी  आंदोलन यास आज रोजी बारामती एस.टी. अगार येथे पाठींबा दिला. त्यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष ॲङ विनोद जावळे,पुणे जिल्हा सचिव मयुर जाधव बारामती शहर तालुका संघटक निलेश कदम उपस्थित होत. यावेळी मनसे कामगार संघटनेच्या पाठीशी असून राज्य शासनाने एस. टी. कर्मचा-यांना महाराष्ट्र शासनामध्ये विलीनीकरण करुन घेणे व सातव्या वेतन अयोगानुसार वेतन देणे. या मागण्या मान्य न झाल्यास मनसे रस्त्यावर उतरुन खळखटयाक आंदोलन करेन. असे मनोगत ॲङ विनोद जावळे यांनी व्यक्त केले व पाठींब्याचे पत्र देण्यात आले.एस.टी. कर्मचारी कामगार जगला तरच एस.टी जगेल हे समजून घेण्याची गरज आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पाठीशी व सोबत असलेबाबत पाठिंबा पत्र देण्यात आले.

No comments:

Post a Comment