हनी ट्रॅप प्रकरण,20 लाखाची खंडणी मागणाऱ्या महिलेला पोलिसांकडून अटक..
पुणे:- सध्या हनी ट्रॅपचे प्रकार वाढत असताना व त्याबाबत बातम्या प्रसिद्ध होत असताना आणखी एक बातमी पुढे आली, मोबाईल, व्हॉट्सोॅपद्वारे चॅटिंग व संभाषण करुन जवळीक साधून खंडणी उकळणाऱ्या एका महिलेला पुण्यातील वाकड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. वाकड पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई रहाटणी येथील शिवार चौकात केली. या मध्ये एका महिलेला अटक करण्यात आले आहे.याप्रकरणी सखाराम नारायण नखाते(वय-54 रा. नखातेवस्ती, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.30)फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, आरोपी हिने सखाराम नखाते यांना त्यांच्यात झालेल्या व्हॉट्सोअॅप चॅटिंग, मॅसेजेस असल्याचे सांगितले. ते मेसेज फिर्यादी यांच्या घरी, त्यांच्या सोसायटीतील लोकांना दाखवून समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. मुलींना फसवतो, अशी सोशल मीडियावर बदनामी करुन, स्वत: आत्महत्या करुन गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. हे प्रकरण मिटवण्यासाठी आरोपीने फिर्यादी यांच्याकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. वाकड पोलिसांनी सापळा रचून तक्रारदार यांना आरोपी महिलेला तिने मागणी केल्याप्रमाणे पैसेची तयारी दाखवून महिलेला पैसे घेण्यासाठी बोलावून घेतले. पोलिसांनी भारतीय चलनातील 2000 च्या 12 नोटा व कोरे कागदी 6 बंडल तयार करुन तक्रारदार यांच्याकडे दिले.रहाणटी येथील शिवार गार्डन हॉटेलमध्ये तक्रारदार यांच्याकडून खंडणीची रक्कम घेताना दुपारी एकच्या सुमारास अटक केली. महिलेला न्यायालयात हजर केले असता 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश,अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 आनंद भोईटे,सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक
डॉ. विवेक मुगळीकर,पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष पाटील ,पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव ,पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल , पोलीस अंमलदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, डॉ. विवेक मुगळीकर ,पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष पाटील,पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव ,पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल , पोलीस अंमलदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार,काळे,राजेंद्र
बापूसाहेब धुमाळ, वंदु गिरे, बाबा चव्हाण,अतिक शेख, प्रशांत गिलबिले, प्रमोद कदम,विजय गंभीरे, विक्रम कुदळ, दिपक साबळे,अतिष जाधव, कल्पेश पाटील व कौतेय खराडे यांच्या पथकाने केली.
No comments:
Post a Comment