बारामती-इंदापूर रस्त्यावरील पिंपळीनजीक देवकाते वस्तीवर भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराचा घेतला बळी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 31, 2021

बारामती-इंदापूर रस्त्यावरील पिंपळीनजीक देवकाते वस्तीवर भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराचा घेतला बळी..

बारामती-इंदापूर रस्त्यावरील पिंपळीनजीक देवकाते वस्तीवर भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराचा घेतला बळी..                                                                                            बारामती:- दि.31 रोजी दुपारी 1/15 च्या दरम्यान इंदापूर बारामती रस्त्यावर भीषण अपघात झाला या अपघातात तरुण जागीच मरण पावला याबाबत सविस्तर माहिती अशी की, (एमएच १६ एएम ६१११) हा ट्रक इंदापूर-बारामती या राज्यमार्गावरून बारामती
दिशेला जात होता. त्याचवेळी ज्ञानेश्वर मदने ( रा.झारगडवाडी) हा भवानीनगर दिशेने दुचाकी वरून चालला होता. दरम्यान बारामती-इंदापूर रस्त्यावरील पिंपळीनजीक देवकाते वस्तीवर भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये दुचाकी बाजूला पडून ज्ञानेश्वर मदने हा या ट्रक खाली आला. ट्रकचे चाक ज्ञानेश्वरच्या तोंडावरून गेल्याने अक्षरशः त्याच्या चेहर्याचा चेंदामेंदा झाला. रहदारीच्या नियमांचे उलघन करून भरधाव वेगाने ट्रक खाली ज्ञानेश्वर आनंदा मदने याचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने मदने कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. झारगडवाडी गावांवर देखील शोककळा पसरली आहे.याबाबत फिर्याद सचिन लक्ष्मण धोत्रे रा. झारगडवाडी  यांनी दिली, घटनास्थळी शहर पोलीसांनी धाव घेत ट्रक आणि चालकाला ताब्यात घेतले आहे.प्रभारी अधिकारी सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा ओमासे यांनी दाखल करून घेऊन सपोनि वाघमारे या घटनेचा तपास करीत आहे,गु. र. नं.802/2021 भादवि कलम 279,337,338,304(अ),427 मोटार वाहन कायदा कलम 184,134/177 नुसार दाखल करून अधिक तपास बारामती शहर पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a Comment