शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशनसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, January 1, 2022

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशनसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन*

*शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशनसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन*
मुंबई, दि. १ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्या देदिप्यमान कारकिर्दीस सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने शिक्षण क्षेत्रात काही नवे करु पाहणाऱ्या गुणवंत शिक्षकांसाठी प्रतिष्ठानच्या वतीने  ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन’ साठी एक जानेवारी २०२२ पासून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी हे आवाहन केले असून राज्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी यासाठी अर्ज करावेत, असे त्यांनी म्हटले आहे.

कृषी, साहित्य व शिक्षण या तीन क्षेत्रातील गुणवंत व कर्तबगार तरुणांसाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप देण्यात येत आहे. यापैकी कृषी व साहित्य क्षेत्रातील फेलोंची सध्या निवड करण्यात आली असून आता शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज पाठविण्याची अंतीम मुदत ३१ जानेवारी ही आहे. 

फेलोशिपसाठी इच्छुकांनी आपले प्रस्ताव साधारणतः एक हजार शब्दांमध्ये तयार करुन  www.sharadpawarfellowship.com येथे दाखल करावेत. अर्जाची छाननी व निवडप्रक्रिया १ फेब्रुवारी २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२२ या दरम्यान होणार असून १२ मार्च २०२२ रोजी अंतीम २० फेलोंची नावे घोषीत केली जाणार आहेत. या फेलोशिपचा कालखंड जुन २०२२ ते एप्रिल २०२३ या दरम्यान असेल, असे सुळे यांनी म्हटले आहे.

यासाठीची पुर्वतयारी एप्रिल २०२२ तर कार्यशाळा मे २०२२ मध्ये घेण्यात येईल. तरी या फेलोशिपसाठी इच्छुक असणाऱ्या शिक्षकांनी मुदतीत आपले प्रस्ताव सादर करावेत.  या फेलोशिपला एमकेसीएल फाऊंडेशनचे सहकार्य लाभले असून विवेक सावंत या फेलोशिपचे समन्वयक असतील. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी कृपया ९३७०७९९७९१ किंवा ९८५०१२२७१३ या मोबाईल नंबर्सवर संपर्क साधावा, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी कळवले आहे.

No comments:

Post a Comment