भर बाजार पेठेत दुकान फोडणाऱ्या दोन महिलांना अटक..
बारामती:- सरत्या वर्षाला निरोप देत असताना. सिनेमा रोडवरील गांधी ऑटोमोबाइल दुकान फोडून दुकानातील रोख दहा हजार रुपये व पितळी गन मेटल बुशिंग पंचवीस हजार रुपये तसेच लोखंडी बेरिंग दहा नग किंमत 5000 असा 40000 हजार रुपयाचा ऐवज पहाटेच्या वेळी कुणीतरी अज्ञात इसमांनी चोरून नेले बाबत समीर शांतीकुमार गांधी राहणार विजयनगर कॉलनी यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती तसेच बुरणी मशनरी व महाराष्ट्र मशनरी दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न झालेला होता. या रात्रीच्या घरफोडी मुळे बारामती शहरातील व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष होता. शहरातील व्यापारी असोसिएशनने सुद्धा प्रभारी अधिकारी यांना गुन्हा उघड झाला पाहिजे याबाबत तगादा लावला होता . सदरचा गुन्हा उघड झाला पाहिजे असे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात आदेश दिले. गुन्हा उघड करण्याचा प्रयत्न म्हणून बारामती शहर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाची पाहणी केली व त्यामध्ये दोन महिला चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले. चित्रीकरणा ची परत-परत पाहणी करून सदरच्या महिलांची ओळख पोलिसांनी पटवली सदरच्या चोरी करणाऱ्या महिला आरती शंकर पाथरकर वय 26 वर्षे राहणार अमराई व आरती उर्फ ताई शंकर पाथरकर वय 20 वर्ष असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्या दोघींना पोलिस ठाण्यात आणून अटक केली व त्यांच्याकडून वर प्रमाणे चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. सदर चा तपास बारामती शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश वाघमारे पोलीस उपनिरीक्षक, गणेश पाटील सागर घोडके,पो हवा रामचंद्र शिंदे
,पो ना दशरथ कोळेकर,पो कॉ दशरथ इंगोले
,पो कॉ गौरव ठोंबरे,पो कॉ सचिन कोकणे,
म पो कॉ गवळी यांनी केलेला आहे.
No comments:
Post a Comment