विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वस्तीगृहाच्या अध्यक्षपदी गणेश शिवराम सोनवणे यांची सर्वानुमते निवड.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, June 26, 2026

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वस्तीगृहाच्या अध्यक्षपदी गणेश शिवराम सोनवणे यांची सर्वानुमते निवड..

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वस्तीगृहाच्या अध्यक्षपदी गणेश शिवराम सोनवणे यांची सर्वानुमते निवड..
बारामती :- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वस्तीगृहाच्या कार्यकारिणीची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यामध्ये चेअरमन पदी गणेश शिवराम सोनवणे, उपाध्यक्ष पदी प्रतिभा संजय मोरे, सचिव पदी  धनपाल विश्वनाथ भोसले, सहसचिव पदी सुशील कुमार सोनवणे, तर खजिनदार पदी विजय नामदेव सोनवणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या निवडीप्रसंगी माजी चेअरमन अशोक (अण्णा) सोनवणे, संजय दादा मोरे तसेच दयानंद मिसाळ सर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांनी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश शिवराम सोनवणे हे अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे कार्यरत असून समाजातील वंचित आणि गरजू घटकांसाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा, नेतृत्वगुणांचा आणि संघटन कौशल्याचा विचार करून त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश शिवराम सोनवणे यांनी वस्तीगृहाच्या सर्वांगीण विकासासाठी, विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि संस्थेची सामाजिक बांधिलकी अधिक प्रभावीपणे जपण्यासाठी सर्व पदाधिकारी, सदस्य आणि समाजबांधवांना सोबत घेऊन पारदर्शक व लोकाभिमुख पद्धतीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे संस्थेच्या विकासाला नवी दिशा मिळेल, तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी अधिक प्रभावी उपक्रम राबविले जातील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला

No comments:

Post a Comment