पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त बहुजन मार्गदर्शन मेळावा व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, June 26, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त बहुजन मार्गदर्शन मेळावा व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त बहुजन मार्गदर्शन मेळावा व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन
बारामती : अहिल्याक्रांती महिला विकास प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) प्रेरित क्रांती शौर्य सेना यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त बहुजन मार्गदर्शन मेळावा व गुणगौरव सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता पालखीतळ ग्राऊंड, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यासमोर, भवानीनगर (बारामती-इंदापूर रोड) येथे होणार आहे. यंदाचे हे आयोजन सलग १२ व्या वर्षी होत आहे.

कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ३ ते ४ या वेळेत गजी ढोल नृत्याने होणार असून, त्यानंतर महिलांसाठी मनोरंजनात्मक "खेळ पैठणीचा" कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ४.३० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असून, सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सार्वजनिक सामाजिक जयंती महोत्सव साजरा केला जात असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी, महिला-पुरुषांनी तसेच विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन अहिल्याक्रांती महिला विकास प्रतिष्ठान, अध्यक्षा सौ. कल्याणी सुजित वाघमोडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला उत्सव समिती व सर्व सहयोगी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment