28 डिसेंबर रोजी पत्रकार संघाचे ठाणे येथे राज्यस्तरीय 16 वे अधिवेशन
महाराष्ट्रातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - वसंत मुंडे
मुंबई प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सोळावे राज्यस्तरीय अधिवेशन ठाणे येथील गडकरी रंगायतन सभाग्रहात मंगळवार दिनांक 28 डिसेंबर रोजी होणार आहे. या राज्यस्तरीय अधिवेशनाला महाराष्ट्रातील सर्वाधिक पत्रकारांनी आपला सहभाग उस्फूर्तपणे नोंदवावा असे आवाहन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सोळावे राज्यस्तरीय अधिवेशन दरवर्षीप्रमाणे यावर्षी ठाणे येथील रंगायतन सभाग्रहात मंगळवार दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे.या राज्यस्तरीय अधिवेशनाला नामवंत पत्रकार उपस्थित राहणार असून मान्यवरांची देखील उपस्थिती लाभणार आहे. या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणाऱ्या पत्रकार संघाच्या सभासदांना पत्रकार संघाच्यावतीने देण्यात येणारे साहित्य अधिवेशन स्थळी देण्यात येणार आहे. या अधिवेशनाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व राज्यस्तरीय प्रमुख पदाधिकारी, विभाग स्तरावरील प्रमुख पदाधिकारी, जिल्हा, शहर, तालुका स्तरावरील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि पत्रकार संघाचे सर्व सभासद बांधव भगिनींनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्याच बरोबर पत्रकार संघाच्या या सोळाव्या राज्यस्तरीय अधिवेशनाला महाराष्ट्रातील सर्व पत्रकार, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियाचे विविध विभागातील प्रतिनिधी आणि पत्रकार प्रेमी सुजान नागरिकांनी या अधिवेशनाला उपस्थित राहून या स्तुत्य उपक्रमास ऐतिहासिक स्वरूप द्यावे असे आवाहन पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment