बारामती बाजार समिती मध्ये शासकीय तुर खरेदी केंद्रासाठी नाव नोंदणी सुरू... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 22, 2021

बारामती बाजार समिती मध्ये शासकीय तुर खरेदी केंद्रासाठी नाव नोंदणी सुरू...

बारामती बाजार समिती मध्ये शासकीय तुर खरेदी केंद्रासाठी नाव नोंदणी सुरू...
बारामती:- हंगाम २०२१-२०२२ मधील किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत हमीभावाने तुर खरेदी करण्याकरिता नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्याबाबत शासनाने कळविले आहे.त्यानुसार रू. ६३००/- प्रति क्विटल हमीभावाने तुर खरेदी साठी दि. २०/१२/२०२१ पासुन शेतक-यांची नोंदणी सुरू झाली असुन दि ०१/०१/२०२२ पासुन तुर खरेदी प्रक्रिया सुरू
करणेत येणार आहे. सध्या तुरीचा हंगाम सुरू झाला आहे. बाजार आवारात तुरीचे दर हमीभावापेक्षा कमी निघत आहेत. त्यामुळे बाजार समितीने शासनाकडे मागणी केली होती. सदर नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असल्याने बारामती तालुक्यातील तुर उत्पादक शेतक-यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून तुर खरेदी केंद्राचा फायदा घ्यावा असे आव्हान बारामती बाजार समितीचे सभापती वसंत गावडे व उपभापती दत्तात्रय सणस यांनी केले आहे.सदर नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करावयाची असल्याने नोंदणी करण्यासाठी प्रचलित पद्धतीने शेतक-यांनी आधारकार्ड, सन २०२१-२०२२ मधील ऑनलाईन ७/१२ उतारा, पिक पेरा आणि IFSC कोड सह बँकेचे पासबुक झेरॉक्स, मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत. शासनाने दिलेल्या कालावधी मध्ये शेतक-यांनी बाबालाल काकडे निरा कॅनॉल संघ, तिन हत्ती चौक बारामती येथे शेतकरी नोंदणी करावयाची आहे. त्यामुळे तुर उत्पादक शेतक-यांनी वेळेत नोंदणी करावी. शेतक-यांनी आपला शेतमाल खरेदी केंद्रावर आणताना शासनाचे निकषा प्रमाणे स्वच्छ व वाळवुन आणावा अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

No comments:

Post a Comment