बारामतीत गावठी हातभट्टीची 40 लिटर दारू जप्त करून कारवाई... बारामती:- उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी बारामती तालुक्यात कोणत्याही प्रकारचे अवैद्य धंदे चालू देऊ नका याबाबत सतत आदेश सर्व प्रभारी अधिकारी यांना दिलेले आहेत. त्यांच्या आदेशान्वये बारामती शहर पोलीस ठाणे काल दिनांक 16 डिसेंबर रोजी पेट्रोलिंग करत असताना इसम नामे अमोल गव्हाणे वय 30 वर्षे राहणार माळेगाव हा बुलेट मोटरसायकल क्रमांक MH 42 BD 589 वर गावठी हातभट्टीची 40 लिटर दारू ते शरीरास अपायकारक व विषारी आहे हे माहित असताना सुद्धा साठे नगर कसबा या ठिकाणी मीनाताई गव्हाणे हिला विक्री करत असताना मिळून आले. त्याला भा द वी 328 दारूबंदी कायदा 65 ब प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.तसेच आज दिनांक 17 डिसेंबर रोजी पान गल्ली या ठिकाणी बाळकृष्ण गरुड इसम नामे अमित बाळकृष्ण गरड वय 29 राहणार जामदार रोड हे कल्याण मटका पैशाची देवाणघेवाण करून नशिबावर मटका जुगार घेत असताना मिळाला. सदर इसम पुढे सदरचा मटका मयूर दीपक कांबळे याला फिरवत असल्याचे निदर्शनास आले त्याला सुद्धा या गुन्ह्यात अटक करण्यात आली त्यांच्याकडून एकूण. 340 रुपये रोख पिन मटका चिठ्ठी इत्यादी साहित्य जप्त करण्यात आली सदरची कारवाई पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश पाटील. पोलीस अंमलदार दशरथ कोळेकर कल्याण खांडेकर तुषार चव्हाण मनोज पवार बंडू कोठे रामचंद्र शिंदे अजित राऊत दशरथ इंगोले यांनी केलेली आहे
Post Top Ad
Friday, December 17, 2021
बारामतीत गावठी हातभट्टीची 40 लिटर दारू जप्त करून कारवाई...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment