वाळू माफियाची चक्क..प्रातांधिकारी यांना जीवे मारण्याची धमकी देवून धक्काबुकी..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 17, 2021

वाळू माफियाची चक्क..प्रातांधिकारी यांना जीवे मारण्याची धमकी देवून धक्काबुकी..!

वाळू माफियाची चक्क..प्रातांधिकारी यांना जीवे मारण्याची धमकी देवून धक्काबुकी..!                                                                        फलटण(प्रतिनिधी):-  वाळू माफियांना कसलाच धाक उरला नसून चक्क फलटणचे प्रातांधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप
यांना जीवे मारण्याची धमकी देवून धक्काबुकी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रातांधिकारी फलटण यांनी शहरातील गिरवी नाका येथे वाळू माफियाचा वाहन अडवून कारवाई केली होती. याबाबतची फि्याद फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिलेली आहे. फिर्यादीवरून कैलास महादेव
ननावरे (वय-44, रा.मंगळवार पेठ, झिरपे गल्ली,फलटण) याच्या विरोधात फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरूवारी दि. 16 रोजी सायंकाळी 7 ते 7.15 वाजता प्रातांधिकारी शिवाजीराव जगताप हे कृत्रिम अवयव निर्मिती निगम या कार्यक्रमाचे मीटिंग झाल्यानंतर शासकीय वाहनाने तहसीलदार, तलाठी ,असे सजाई गार्डन येथून बाहेर पडले होते. तेथून बाहेर पडल्यानंतर एक हायवा ट्रक जाधववाडी कडून फलटणकडे जाताना दिसला.त्याच्याकडे कागदपत्र नसल्याने वाळूचा व वाहनाचा पंचनामा जप्ती पंचनामा करून गाडी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनकडे येत होते. त्यावेळी गिरवी नाका येथे आल्यावर एक इसम गाडीसमोर आडवा येऊन तलाठी श्री. धेंडे यांना म्हणत होता की माझी गाडी मी घेऊन जाणार आहे.त्यावेळी त्यास मी प्रांताधिकारी आहे. सदर गाडीत वाळू असून त्यास परवाना नाही. गाडी पोलीस स्टेशनला घेऊन निघालो आहे. सदर इसमास नाव विचारले असता त्याने कैलास ननावरे असे सांगून फिर्यादीचे
अंगावर धावून आला व मी तुला जिवंत सोडत नाही असे म्हणून फिर्यादी प्रातांधिकारी शिवाजीराव जगताप यांना धक्काबुक्की केली. जिवे मारण्याची धमकी देऊन शासकीय काम करून न देता शासकीय कामात अडथळा आणला म्हणून दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करित आहेत.

No comments:

Post a Comment