बारामतीतील गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई होणार! पिस्तुलाचे स्टेटस ठेवणे,तलवारीने केक कापणे अशांवर करडी नजर... बारामती:- बारामती मध्ये सध्या टोळी गॅंगचे धुडगुस वाढला असून कोणी तरी मास्टर माईंड यांचे स्टेटस व फोटो ठेवून ही तरुणाई नशेत कुठेही दादागिरी करीत असल्याचे अनेक गुन्हे दाखल झाले आहे, विनाकारण कर्कश आवाज करून गाड्या चालविणे, कॉलेज परिसरात टोळके करून गप्पा मारत बसणे, मारामारी करणे असले प्रकार वाढत असून स्थानिक रहिवासी अक्षरशः वैतागले आहे, वाळू माफिया सारखे गुंड अश्या गुन्हेगाराना फोसात असतात, त्यामुळेच बारामती तालुक्यात अवैध धंदे करण्यावर वारंवार कारवाई करूनही त्यांच्यात सुधारणा होत नसेल, तर तडीपारीचा पवित्रा घेण्यात येईल,असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिला.त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.त्या वेळी त्यांनी आणखी १८ जणांचे मोक्काचे प्रस्ताव तयार असल्याचे सूचित केले.बारामती तालुक्याचा नव्याने पदभार स्वीकारणारे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी माळेगाव पोलिस दूरक्षेत्राच्या ठिकाणी बुधवारी (दि.१५) बैठक घेतली.त्यांनी आपल्या कामाचा प्रवास कथन करीत पारदर्शकता व स्वच्छ काम करण्याचा आपला मानस असल्याचे नमूद करून विविध विषयांवर सखोल चर्चा केली. पिस्तुलाचे स्टेटस ठेवणे,तलवारीने केक कापणे अशांवर करडी नजर ठेवली जाणार आहे.आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याकडे लक्ष वेधले जाणार आहे. अवैध धंदे कायम बंद करणे, माळेगाव पोलिस दूरक्षेत्र येथे
पोलिस कर्मचारी वाढविणे, महिला पोलिस कर्मचारी नेमणूक करणे,रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी प्रत्येक शाळेत निर्भया पथकाच्या वतीने प्रबोधन करणे व बिट अंमलदार भेटी देणे, माळेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून हप्तावसुली करणार्यांवर कारवाई करणे, सांगवी (ता. बारामती)येथील अतिक्रमणे काढणे, माळेगाव कारखाना ऊस वाहतूक करणाच्या वाहनांना रिफ्लेक्टर बसविणे,
बारामती-फलटण रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणे, अल्पवयीन दुचाकीचालकांवर कारवाई करणे, फ्लेक्सबंदी करणे,अवैध वाहतुकीला चाप बसविणे,राजकीय आकसातून खोटे गुन्हे दाखल होण्याची सत्यता पडताळून पाहणे, समाजात सलोखा निर्माण करणे, सोशल मीडियातील आक्षेपार्ह संदेशावर नजर ठेवणे, राजहंस चौकात वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना तसेच पोलिसांची प्रतिमा उंचावणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांनी केले. आभार योगेश भोसले यांनी मानले.
No comments:
Post a Comment