गुटखा वाहतूक करण्याऱ्यावर गुन्हा दाखल,१७,४४,४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 10, 2021

गुटखा वाहतूक करण्याऱ्यावर गुन्हा दाखल,१७,४४,४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त

गुटखा वाहतूक करण्याऱ्यावर गुन्हा दाखल,१७,४४,४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त..                                                                      यवत:- गुटखा बंदीचा आदेश असताना देखील आज पर्यंत सर्रास गुटखा चालू आहे अशीच एक प्रतिबंधित गुटखा वाहतुक करण्याच्या
हेतूने साठा करून पिकअप गाडी क्र.एम.एच.४२ एक्यू ४९३० ह्या गाडीमध्ये गुटखा,तंबाखू असा मुद्देमाल आढळुन आल्याने अन्न व औषध
प्रशासन अधिकारी क्रांती बारवकर यांनी
दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी राजेंद्र
गणपत मलभारे,वय.५७,राहुल राजेंद्र
मलभारे,वय ३२ वर्ष ( दोघेही रा.मलभारे
वस्ती,यवत ता.दौंड,जि.पुणे) यांच्यावर
यवत पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम २७२,२७३, १८८,३२८,अन्न सुरक्षा आणि
मानके अधिनियम २००६ चे कलम २६
(२),(प),२७ (३),(क), (म),कलम
५९,सहवाचन कलम ३ (प),२२ (अ) व
कलम ३० (२) नुसार गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या अधिक
माहितीनुसार,शासनाने प्रतिबंधित
केलेला गुटखा आणि तंबाखूची वाहतूक
करण्याच्या हेतूने दौंड तालुक्यातील
यवत मधील मातोश्री निवासाच्या समोर
एका पीक अप गाडीमध्ये सुगंधी
तंबाखू,गुटखा असा साठवणूक
केलेला तब्बल १७ लाख ४४ हजार ४४०
रुपयांचा मुद्देमाल आढळून आल्याने
अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने
गुन्हा दाखल करण्यात आला असून,मुद्दमाल हस्तगत करण्यात आला आहे.याप्रकरणी यवत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment