केंद्राच्या एडीप योजनेतील कॉक्लिअर इंप्लान्टचा खर्च वाढवून द्यावा-खासदार सुळे यांची लोकसभेत मागणी* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 14, 2021

केंद्राच्या एडीप योजनेतील कॉक्लिअर इंप्लान्टचा खर्च वाढवून द्यावा-खासदार सुळे यांची लोकसभेत मागणी*

*केंद्राच्या एडीप योजनेतील कॉक्लिअर इंप्लान्टचा खर्च वाढवून द्यावा-खासदार सुळे यांची लोकसभेत मागणी*
दिल्ली, दि. १४ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत बोलताना दिव्यांग व्यक्ती व विशेष गरजा असणाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या 'एडिप' योजनेत कॉक्लिअर इंप्लान्ट शस्त्रक्रिया आणि त्यानंतरच्या देखभाल दुरुस्तीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. यासाठी देण्यात येणारा खर्च वाढवून देण्याची।मागणी त्यांनी यावेळी केली.
 केंद्र सरकारच्या एडिप (ADIP) योजने अंतर्गत देशातील गरजू कर्णबधीर रुग्णांच्या कोक्लिअर इंप्लान्ट शस्त्रक्रिया केल्या जातात. याशिवाय त्या त्या परिस्थितीत गरजू रुग्णांना कानाचे मशीन सुद्धा दिले जाते. वास्तविक कॉक्लिअर इंप्लान्ट ही अतिशय महागडी शस्त्रक्रिया आहे. याशिवाय शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना बसवली जाणारी मशीन देखील महाग आहे.  इतकेच नाही, तर त्याच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च जवळपास ८५ हजार रुपये इतका आहे, ही बाब त्यांनी सरकारच्या लक्षात आणून दिली. 
त्या म्हणाल्या, शस्त्रक्रिया आणि त्यानंतर होणारा हा खर्च पाहता, आपली संबंधित खात्याला विनंती आहे की, योजनेत कॉक्लिअर इंप्लान्टची रक्कम वाढवून द्यावी. याशिवाय ते संबंधित लाभार्थी हा १८ ते २१ वर्षांचं होईपर्यंत यासंबंधीचा खर्च देखील या योजनेअंतर्गत त्याला द्यावा. सरकारने या खर्चासाठी वाढीव रक्कम दिली तर देशभरातील गोरगरीब कर्णबधीर रुग्णांना त्याचा फायदा होईल; आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत ही योजना पोहोचून हजारोजनांना त्याचा लाभ मिळू शकेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

No comments:

Post a Comment