समाज गौरव पुरस्काराने छाया खैरनार सन्मानित*
नागपूर : १०/१२/२०२१रोजी,आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवसाच्या निमित्ताने श्री साई सभागृह, नागपूर या ठिकाणी केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली आणि दैनिक केंद्रीय मानवाधिकार हिंदी समाचार पत्र यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय संमेलन आणि समाज गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .
केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली,मराठी अभिनेत्री अश्विनी चांद्रकापुरे,मा.अभिजित देशमुख (न्यायाधीश वरिष्ठ स्तर, सचिव जिल्हा विधिक सेवा प्राधिकरण,नागपूर),मा.संजय पांडे(वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक,महामार्ग सुरक्षा पथक ,नागपुर) मा.प्रकाश भागवत (मराठी सिने अभिनेता ,मुंबई)शुभहस्ते सामाजिक कार्यकर्त्या मा.छाया खैरनार यांना " लाईफ प्राईड अवॉर्ड'' या पुरस्कारा " ने सन्मानित करण्यात आले . यावेळी केंद्रीय मानवाधिकार संघटना राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद दहिवले यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते .
छाया खैरनार त्यानी यावेळी बोलताना म्हणाल्या की , लाईफ प्राईड पुरस्कारांने जबाबदारी आणखी वाढली आहे . समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी भरीव काम आजवर केले आणि भविष्यामध्ये सुद्धा करणार आहे . ज्या समाजामध्ये आपण राहतो त्याचे काहीतरी देणे लागतो ही प्रमाणिक भूमिका घेऊनच माझी सार्वजनिक जीवनातील आजवरची वाटचाल झाली आहे . अशा अनेक पुरस्कारांनी मला आजवर सन्मानित करण्यात आले . परंतु , केंद्रीय मानवाधिकार संघटनेने दिलेला " लाईफ प्राईड अवॉर्ड" हा माझ्या कुटुंबाने केलेला माझा सन्मान आहे . तो अविस्मरणीय आहे , त्यामुळेच त्यांच्या ऋणात राहूनच मी माझी पुढील वाटचाल करत समाजिक कार्यात अग्रेसर राहणार आहे .
छाया खैरनार यांना ''लाईफ प्राईड अवॉर्ड"या पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील सर्व घटकांतील नागरिक त्यांचे कौतुक करत अभिनंदनसह शुभेच्छांचा वर्षाव करत आहे .
No comments:
Post a Comment