अ.ब.ब...पुन्हा रेशनिंगचा काळाबाजार बारामतीत,पोलीसांनी केला १,७८,७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, December 11, 2021

अ.ब.ब...पुन्हा रेशनिंगचा काळाबाजार बारामतीत,पोलीसांनी केला १,७८,७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त..

अ.ब.ब...पुन्हा रेशनिंगचा काळाबाजार बारामतीत,पोलीसांनी केला १,७८,७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त..                           बारामती:-बारामतीत सद्या रेशनिंगचा काळाबाजार चालू असल्याचे होत असलेल्या दाखल गुन्हा वरून दिसुन येत आहे, वारंवार तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नव्हती तहसील कार्यालय याकडे कानाडोळा करीत आहे की काय अशीच सद्या चर्चा चालू असून प्रत्यक्ष पोलिसांनाच कारवाई करण्याची वेळ येत आहे आणि त्यांनी देखील अश्या अनेक कारवाई केली असून येथून पुढे देखील करतीलच पण तहसील कार्यालय यासाठी काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे अशी पुन्हा एकदा कारवाई बारामती शहर पोलिसांनी दिनांक १०/१२/२१ रोजी रात्री १०/०० वाजण्याच्या सुमारास तपास पथक कर्तव्यावर असताना गोपनीय माहिती मिळाली की एक पिकअप क MH 42 AQ 3603 यामध्ये मोहन शंकर रणदिवे यांचे निरा बारामती रोड नंदन पेट्रोलपंप समोर बारामती येथील सरकारमान्य रेशन धान्य दुकानातून खाजगी पिशव्यामध्ये रेशनिंगचा माल भरून तो खुल्या बाजारात विक्रिकरीता जात आहे.अशी माहीती मिळताच पोलिस पथक श्रीरामनगर भिगवण रोड बारामती त.बारामती जि.पुणे वर नमूद वाहन जाताना दिसुन आले. सदर वाहनाची तपासणी केली असता त्याचे हौदामध्ये एकूण 25 पिशव्या  रेशन तांदूळ मिळून आला. सदर वाहनाचा चालक  सोमनाथ रामचंद्र भापकर रा. सटवाजीनगर बारामती याचेकडे विचारणा केली असा सदर पिशव्यामध्ये तांदुळ असून तो मोहन शकर रणदिवे यांचे निरा बारामती रोड नंदन पेटोलपंप समोर बारामती येथील रेशनचे दुकानात भरलेला असून तो मार्केट यार्ड बारामती येथे विक्री करीता घेवून जाण्यास मोहन रणदिवे यांनी सांगितल्याचे चालकाने कळविले.  यावरून सदर रेशनिंगचा माल हा बेकायदेशीरपणे विनापरवाना खुल्या बाजारात विक्रीकरीता घेवून जात असल्याची खात्री झाल्याने तसेच त्या बाबत काहीएक पुरावे देऊ न शकल्याने एकूण १,७८,७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर आरोपी यांनी स्वस्त धान्य याबाबत असलेल्या शासनाच्या व माननीय जिल्हाधिकारी यांच्या कंट्रोल ऑर्डर चे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलेले आहे. सदर दोन्ही आरोपीविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. सदर बाबत पुरवठा विभागाची मदत घेऊन सखोल चौकशी करण्यात येणार आहे. याप्रकारे शासकीय बारदाना बदलून धान्य खाजगी बारदाना भरून मार्केट मध्ये विकले जाते याबाबत शोध घेऊन यापुढेही कारवाया करण्यात येणार आहेत. धान्याची बिले जर खोटी असतील तर त्याबाबत ही कारवाई करण्यात येणार आहे.सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे पोलीस नाईक दशरथ कोळेकर पोलीस नाईक खांडेकर पोलीस नाईक तुषार चव्हाण व पवार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment